नगरपालिकांत घसरण झाल्यानंतर काँग्रेसचा नांदेडमध्ये 'ठाकरे प्रयोग'! File Photo
नांदेड

नगरपालिकांत घसरण झाल्यानंतर काँग्रेसचा नांदेडमध्ये 'ठाकरे प्रयोग'!

मागील काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अव्वल राहिलेला काँग्रेस पक्ष नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीत चौध्या स्थानावर घसरला.

पुढारी वृत्तसेवा

After a decline in the municipal elections, the Congress party attempts a 'Thackeray experiment' in Nanded!

विशेष प्रतिनिधी

नांदेड: मागील काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अव्वल राहिलेला काँग्रेस पक्ष नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीत चौध्या स्थानावर घसरला, त्यानंतर आता नदिड-वाघाळा महापालिकेचा रणसंग्राम सुरू होत असून या संस्थेत २५ वर्षाहून अधिक काळ सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेस पक्षासाठी नांदेड महानगरातील आपले अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यात पक्षाच्या स्थानिकांना मदत मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाच्या राज्य शाखेने 'ठाकरे प्रयोग' केला आहे.

या प्रयोगातील ठाकरे म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे. पक्षाने त्यांच्यावर प्रभारीपदाची जबाबदारी टाकली आहे. त्याआधी मनपा निवडणु‌कीसाठी काँग्रेसने समन्वयकपदी अनुभवी कार्यकर्ते श्याम दरक यांची नियुक्ती केली होती. विद्यमान प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आलेल्या सूचनेनुसार ठाकरे यांना नांदेडचे प्रभारी करण्यात आले आहे.

त्यांनी येत्या २५ तारखेला पक्षातील काही प्रमुखांना मुंबईत पाचारण केले आहे, तर स्वतः ठाकरे २९ डिसेंबर रोजी नांदेडला येणार आहेत, ही माहिती त्यांनी स्वतःच सोमवारी दिली. नांदेड-वाघाळा मनपा निवडणुकीची प्रक्रिया मंगळवारपासून (दि.२३) सुरू होत भाजपाने खा. अशोक चव्हाण यांना निवडणूक प्रमुखपदी नियुक्त केले आहे. चव्हाण काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांचे व ठाकरे यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. ठाकरे यांनी काही काळ नांदेडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या नात्यानेही त्यांचा नांदेडशी जवळून संबंध आला होता. जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडनुकीत भाजपाने आपल्या चिन्हावर नगरसेवकपदाच्या पाऊणशे जागा निवडून आणल्या, तर काँग्रेस पक्षाला नगरसेवकपदांमध्ये पन्नाशीही गाठता आली गाही. काँग्रेसच्या खालोखाल नगसेवकपदाच्या ३३ जागा मिळविणाऱ्या मजपा (मराठवाड़ा जनहित पार्टी) च्या यशामागे भाजपातील चव्हाण गटाचे अहस्य हात होते. हे रविवारच्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. नांदेड मनपात आगले संख्याबळ वाढवतानाच भाजपाकडून असे काही प्रयोग होण्याची चर्चा सुरू असल्यामुळे काँग्रेस पक्षासमोर येणाऱ्या अडथळ्यांचा विचार करून ठाकरेंसारखा अनुभवी नेता नांदेडमध्ये देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसला आजवरच्या लौकिकानुसार यश मिळाले नाही नांदेड लोकसभा क्षेत्रातील आठ नगरपरिषदांपैकी एकाही ठिकाणी काँग्रेसला नगराध्यक्ष निवडून आणत्ता अश्ला नाही. भोकर, धर्माबाद आणि मुखेड या मोठ्या नगरपालिकांत काँग्रेसचा एकही नगरसेवक आता दिसणार नाही. या निकालांतून कविसच्या स्थानिक खासदारांचे अपयश तळक झाले. धनशक्तीत हा पक्ष कमकूवत होताच आणि राजकीय मुत्सद्देगिरी व प्रगल्भतेतही कमी पडला. या पक्षात कोठेही ताळमेळ समन्वय नव्हता नियोजनामध्ये एकही अनुभवी नेता दिसला नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरे यांच्यावर नदिड प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली.

काँग्रेस पक्षाकडे वेगवेगळ्या प्रभागांतून २००हून अधिक इच्छुकांनी उमेदवाली मागितल्यानंतर या इच्छुकांच्या मुलाखती जिल्हा काँग्रेस कार्यालयात गेल्या आठवड्यात घेण्यात आल्या. मुलाखत देणाऱ्यांमध्ये मुस्लिमबहुल भागातील पक्षाचे माजी नगरसेवक वगळता बहुसंख्य इच्छुक नवे नवराचे असल्याचे दिसून आले. वजिराबाद प्रभागात भाजपाकडे एकाहून एक सशक्त उमेदवार उमेदवारीसाठी पुढे आलेले असताना या प्रभागांत काँग्रेसकडे सत्तरी पार केलेल्या एका महिलेने उमेदवारी मागितल्याचे दिसून आले. स्थानिक परिस्थितीची प्राथमिक माहिती घेतल्यानंतर वेत्या गुरुवारी माणिकराव ठाकरे २९ रोजी नांदेडला येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT