Sand Smugglers : तक्रारीनंतर वाळू तस्करांविरुद्ध कारवाई file photo
नांदेड

Sand Smugglers : तक्रारीनंतर वाळू तस्करांविरुद्ध कारवाई

माहूर : पैनगंगा नदीपात्रातील लांजी पेंडावरून सुरू होता वाळू उपसा

पुढारी वृत्तसेवा

Action taken against sand smugglers after complaint

श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा : माहूर तालुक्याला वळसा घालून वाहणाऱ्या पैनगंगानदी पात्रातील लांजी पेंडावर महसूल प्रशासनाने कारवाई करीत वाळू उपसा करणाऱ्या एका टूटेन मशीनद्वारे बोट पाण्यात बुडवून सेक्शन पाईपसह काही किरकोळ साहित्य तहसील कार्यालयात जमा केले आहे. वाळू तस्करांनी सलग दोन दिवस अवैधरीत्या वाळूचा उपसा करून शेकडो वाहनातून त्याची वाहतूक होत असल्याची कुणकुण जि.प.चे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांना लागली.

याबाबत त्यांनी तहसील कार्यालय गाठून सदर प्रकाराची माहिती तहसीलदार अभिजित जगताप यांना दिली. त्यानंतर नायब तहसीलदार कैलाश जेठे यांनी प्रत्यक्षस्थळ गाठून सदरची कारवाई करण्यात आली. मागील दोन दिवसांत वाळू तस्करांनी लांजी वाळू घाटातून तीन बोटीच्या मदतीने वाळू उपसा करून शेकडो वाहनातून वाळूची वाहतूक केल्याची माहिती मिळताच जि.प.चे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव हे तहसील कार्यालयात धडकले.

यावेळी त्यांनी महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैधरीत्या वाळूचा झालेला उपसा व शेकडो वाहनांतून झालेली वाहतूक या संदर्भात त्यांनी तहसीलदार अभिजित जगताप यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. त्यानंतर तहसीलदारांच्या आदेशावरून नायब तहसीलदार कैलाश जेठे व ग्राम महसूल अधिकारी चंद्रकांत बाबर यांनी तिथल्याच टूटेन मशीनच्या साहाय्याने ती बोट पाण्यात बुडवून वाळू घाट बंद केला.

माझ्या अंगावर हायवा घालण्याच्या प्रकाराबाबत मी अधिक माहिती घेतली असता, सहायक जिल्हाधिकारी यांचे वाहन समजून त्यांनी तसा प्रकार घडवून आणला असल्याचे समजले. त्यात जर तथ्य असेल तर ही बाब महसूल प्रशासनासाठी अतिशय घातक होय.
-समाधान जाधव, माजी जि.प. उपाध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT