Nanded Crime News : पोलिस पथकावर पिस्तूल रोखणारा आरोपी गोळीबारामध्ये जखमी  File Photo
नांदेड

Nanded Crime News : पोलिस पथकावर पिस्तूल रोखणारा आरोपी गोळीबारामध्ये जखमी

मोक्काअंतर्गत कारवाईतून जामिनावर सुटल्यानंतर मित्राच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांना हवा असलेल्या कुख्यात प्रभाकर हंबर्डे याच्यावर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार करून त्याला ताब्यात घेतले.

पुढारी वृत्तसेवा

Accused who pointed a pistol at a police team injured in firing

नांदेड, पुढारी वृत्तसेवा :

मोक्काअंतर्गत कारवाईतून जामिनावर सुटल्यानंतर मित्राच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांना हवा असलेल्या कुख्यात प्रभाकर हंबर्डे याच्यावर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर नांदेड शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पांगरी शिवारात मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

विष्णुपुरी व परिसरात दहशत पसरवणाऱ्या प्रभाकर हंबर्डे यास सिडको पोलिसांनी मोका कायद्यान्वये कारागृहात स्थानबद्ध केले होते. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. गुन्हेगार प्रभाकर शंकरराव हंबर्डे याने जामिनावर बाहेर येताच आपल्या मित्राचा म्हणजे आकाश वसंता जाधव (वय २२) याचा १८ मे रोजी खंजरने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. याच प्रकरणात ग्रामीण पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना ३ जून रोजी तो विष्णुपुरी परिसरात आला असल्याची माहिती मिळाली.

नांदेड ग्रामीण पोलिस आपल्या मागावर असल्याची माहिती त्याला मिळताच त्याने दुचाकीवर पांगरी शिवाराकडे पळ काढला. पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवला असताना त्याने पांगरी शिवारातील कॅनॉल रोडवर दुचाकी सोडून तो जंगलात पसार झाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता प्रभाकर हंबर्डे याने शेवटी पोलिसांवर पिस्तूल रोखले. पिस्तूल रोखताच नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याच्यावर कमरेखाली गोळी झाडली आणि तो जागीच कोसळला. हा थरार पांगरी शिवारात मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडला. प्रभाकर हंबर्डे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध प्रकारच्या ९ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक अविनाशकुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह सर्वच अधिकारी घटनास्थळी धावले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारांना वारंवार समज देऊनही त्यांच्या वर्तनात बदल होत नसेल तर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंगळवारी ग्रामीण पोलिसांनी केलेले कामगिरीचे कौतुक करताना पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी संबंधित आरोपीकडून एक रिव्हॉल्वर, एक दुचाकी वाहन, मोबाईल जप्त केल्याची माहिती दिली.

नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुठल्याही गुन् हेगाराची दादागिरी खपवून घेतल्या जाणार नाही. शांततेचा भंग केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केल्या जाईल. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर हंबर्डे यास पुढील कारवाईसाठी अटक केली जाईल.
ओमकांत चिंचोलकर पोलिस निरीक्षक, ग्रामीण पोलिस ठाणे, नांदेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT