नांदेडमध्ये सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर शिक्कामोर्तब file photo
नांदेड

नांदेडमध्ये सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर शिक्कामोर्तब

नांदेडमध्ये २०० खाटांचे स्वतंत्र सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या मागणीवर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

A super multispeciality hospital has been approved in Nanded

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेडमध्ये २०० खाटांचे स्वतंत्र सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या मागणीवर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी शिक्कामोर्तब केले आहे. तसेच, एम्सच्या उभारणीबाबतही सविस्तर अहवाल मागवण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले आहे.

खा. डॉ. गोपछडे यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे देखील उपस्थित होते. डॉ. गोपछडे यांनी यापूर्वी २९ डिसेंबर २०२४, २७ जानेवारी आणि १० फेब्रुवारी २०२५ रोजी या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे ११५ एकर जमीन उपलब्ध आहे. येथे कार्डिओलॉजी (हृदयरोग), न्यूरोलॉजी (मेंदूविकार),नेफ्रोलॉजी (मूत्रपिंड विकार), कर्करोग आणि ट्रॉमा केअरसारख्या गंभीर आजारांवर उपचार मिळतील. यामुळे शासकीय रुग्णालयावरील ताण कमी होऊन नांदेडसह लगतच्या जिल्ह्यातील आणि सीमावर्ती भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार मिळणे शक्य होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT