A. Chikhlikar inaugurated the work worth Rs. 5 crore 14 lakh today
अहमद शेख
लोहा, पुढारी वृत्तसेवा लोहा शहराच्या विकासात नमो उद्यानाची, तसेच छत्रपती शिवाजी महाराज सुशोभीकरणात भर पडणार असून जुन्या शहरात जाणारा मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरण करणे छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण, बुद्ध विहार संरक्षक भिंत व रिटेलिंग वॉल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात काँक्रीटीकरण असे ५ कोटी १४ लक्ष रुपयाच्या कामांचा शुभारंभविधीमंडळ उपविधान समितीचे अध्यक्ष आमदार प्रताप पाटील चिखली यांच्या हस्ते आज रविवारी दुपारी अडीच वाजता संपन्न होणार आहेत.
लोहा शहरातील जनतेनी आ. प्रताप पाटील चिखलीकर यांना नेहमीच साथ दिली आहे आणि त्यांनीही शहराच्या विकासासाठी मोठे योगदान राहिले आहे. बिडवई नगरातील स्वामी समर्थ मंदिरालगत एक कोटी रुपयांचे नमो उद्यान, जुन्या लोहा शहरात जाणारा मुख्य रोड सिमेंट रस्त्यासाठी दीड कोटी रुपये, आ. प्रताप पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्टमध्ये समाविष्ट असलेले जुन्या शहरात कलाल पेठ भागात अर्धा एकरात भव्यदिव्य असे बुध्द्ध विहार उभे राहत आहे.
दीड कोटी रुपयांचा निधी प्रतापरावांनी गेल्यावर्षी दिला होता विहाराचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्या विहाराला रिटेलिंग बॉल व संरक्षक भिंतीसाठी ६४ लक्ष रुपये. शहरात प्रवेश करताना छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. त्या चौकाच्या सुशोभीकरणासाठी ६० लक्ष रुपये, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भागात काँक्रीटीकरणासाठी ४० लाख तर गुराखी गड ते बेनाळ पुलापर्यंतचा रस्ता ४० लक्ष रुपये, मुख्य रोड ते बसस्थानक मागील पोलिस कॉलनी भागात रस्ते व सिसी रोड ६० लक्ष रुपये असे एकूण ५ कोटी १४ लक्ष रुपयांच्या कामाचा शुभारंभविधिमंडळ उपविधान समितीचे अध्यक्ष आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते आज रविवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता भूमिपूजन होणार आहे.
या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, तहसीलदार परळीकर अॅड. मुक्तेश्वर धोंडगे, प्रणिताताई देवरे -चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, केशवराव मुकदम, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर छत्रपती स्वामी (लोहा), छत्रपती धुतमल, मनोहर पाटील भोसीकर, दता वाले, रामराव सूर्यवंशी, करिम शेख, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, पंचशील कांबळे, भास्कर पवार, राहीबाई खिल्लारे, अनुसयाबाई यल्लरवाड, चंद्रकला येळगे, जीवन पाटील चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे.
तेव्हा मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.