A case has been registered against the circle officer who demanded a bribe of Rs. 3,000.
नांदेड, पुढारी वृत्तसेवा कंधार तालुक्यातील कुरुळा येथील ७० वर्षाच्या वृध्द शेतकऱ्याला सातबाऱ्यावरील नावात दुरुस्ती करुन फेरफार करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने तीन हजारांची लाच मागितली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. १७) कारवाईत कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबत अधिक माहिती अशी की, कंधार तालुक्यातील कुरुळा येथील शेतकरी विठोबा शंकर खाडे यांच्या नावावर असलेल्या शेतीच्या सातबारावर नाव दुरुस्ती करायची होती. त्यासाठी खाडे यांनी मंडळाधिकारी शेख नवाज यांच्याकडे गेले असता त्यांनी सातबाऱ्यावरील नावात दुरुस्ती करण्यासाठी खाडे यांना तिन हजारांची लाच मागितली. त्यामळे खाडे यांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करुन पथकातील पोलिस निरीक्षक अर्चना करपुडे यांनी सापळा रचला. मात्र मंडळाधिकारी शेख नवाज याला कुणकुण लागल्याने तो पसार झाला.
शेख नवाजवर तीन, चार व १२ नोव्हेंबर असे तीनवेळा सापळे लावले. मात्र, तीनही वेळेस तो निसटला. त्यामुळे बुधवारी मंडळाधिका-याच्या विरोधात कंदार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के. एस. पठाण व अर्चना करपुडे यांनी सहभाग घेतला.