भरदिवसा कारमधून ४ लाखांची रोकड लंपास ! चोरांचे 'धूमस्टाईल' पलायन file photo
नांदेड

Nanded Crime News : भरदिवसा कारमधून ४ लाखांची रोकड लंपास ! चोरांचे 'धूमस्टाईल' पलायन

'इंजिनमधून ऑईल सांडले' म्हणत मुलींना फसवले; भाग्यनगर पोलिसांसमोर मोठे आव्हान; शहरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

₹4 lakh cash stolen from car in broad daylight! Thieves make a 'Dhoom-style' getaway

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील मालेगाव रोड परिसरात भरदिवसा घडलेल्या एका अत्यंत धाडसी आणि थरारक चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. कारमध्ये ठेवलेली तब्बल ४ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकीवरून आलेल्या तीन अट्टल चोरट्यांनी 5 अत्यंत चलाखीने लंपास केली आणि धूमस्टाईल पलायन केले. भरदिवसा मुख्य रस्त्यावर घडलेल्या या धाडसी चोरीमुळे शहरातील कायदा व 1 सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उमरखेड येथील रहिवासी सुजित भीमराव सुरवसे हे न आपल्या मुलींना नांदेड येथील हॉस्टेलमध्ये भेटण्यासाठी आणि काही कामानिमित्त आले होते. 5 त्यांच्या मित्राने मालेगाव रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून ४ लाख रुपये काढून ते सुरवसे यांच्या स्वाधीन केले होते. ही रक्कम सुरवसे यांनी आपल्या कारमध्ये (क्र. MH-19-CU-9001) ठेवली.

...आणि मुलींनी कारचा दरवाजा उघडला !

त्यानंतर सुरवसे हे मालेगाव रोडवरील 'शिवाजी कॉम्प्लेक्स'मध्ये एका वकिलांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या दोन्ही मुली कारमध्येच बसलेल्या होत्या. हीच संधी साधून दुचाकीवरून तीन चोरटे कारजवळ आले. चोरट्यांनी कारमधील मुलींना गाठून, "तुमच्या कारच्या इंजिनखाली ऑईल सांडले आहे, गाडीला आग लागू शकते, तात्काळ खाली उतरा!" असे सांगून घाबरवले. चोरांच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून दोन्ही मुली घाईघाईने कारमधून खाली उतरल्या.

त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या चोरट्यांपैकी एकाने कारचा दुसरा दरवाजा अत्यंत शिताफीने उघडला आणि ४ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेली. काही समजण्याच्या आतच तिन्ही आरोपी दुचाकीवरून क्षणात पसार झाले.

चोरटे सीसीटीव्हीत कैद, पोलिसांचा कसून शोध

घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. धक्कादायक बाब म्हणजे, चोरी करताना चोरट्यांनी तोंडाला कुठलाही मास्क लावलेला नव्हता. त्यामुळे हे तिन्ही चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहेत. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा माग काढण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !

शहरात भरदिवसा आणि गजबजलेल्या भागात अशी घटना घडल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना थेट आव्हान देणाऱ्या या 'बेधडक' चोरांच्या मुसक्या भाग्यनगर पोलीस कधी आवळतात आणि रोकड हस्तगत कधी करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT