मराठवाडा

नांदेड : रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

अमृता चौगुले

नांदेड : पुढारी वृत्तसेवा : देगलूर तालुक्यातील तुबंरपल्ली शेती शिवारात रानडुकराच्या हल्ल्यात बाबुराव हुलप्पा सलगरे (वय 55) शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी घडली आहे.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या सुमारास शेतकरी बाबुराव सलगरे यांनी पहाटेच्या सुमारास शेतात पाणी सोडण्यासाठी गेले होते. विहिरीच्याबाजूला नाल्याच्या झुडपात रानडुक्कर बसून होते. याबाबत शेतकऱ्याला काहीच माहिती नव्हती. ते नेहमीप्रमाणे विहिरीवरील मोटर चालू करून परत येत होते त्‍यावेळी अचानकपणे रानडुक्कराने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

दरम्यान, जखमी शेतकऱ्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हाणेगाव परिसरासह वन प्राण्याचे त्याच बरोबर रानडुकराचे होदैस वाढल्याने अनेक वेळा या भागातील शेतकरी वन विभागाला कळविल्यानंतर सुद्धा वन विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन या वन प्राण्याचे तात्काळ बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

.हेही वाचा 

SCROLL FOR NEXT