मराठवाडा

नांदेड : पांडुरंग चुट्टेवाड यांच्या निधनानंतर देहदान; कुटुंबियांनी केला संकल्प पूर्ण

अविनाश सुतार

नरसीफाटा; पुढारी वृत्तसेवा : नरसी येथील ज्येष्ठ नागरिक तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग मामा चुट्टेवाट यांच्या निधनानंतर त्यांचे देहदान करण्यात आले. त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी देहदान करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांच्या कुटुंबियांनी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे देहदान करण्याचा त्यांचा संकल्प पूर्ण केला.

पांडुरंग चुट्टेवाट यांचे वयाच्या 70 व्या वर्षी 27 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास निधन झाले. त्यांनी मृत्यूपूर्वी देहदान करण्याचा संकल्प केला होता. दरम्यान, पांडुरंग चुट्टेवाट यांनी जीवनभर समाजाची सेवा करून मृत्यू नंतर विद्यार्थ्यांना मानवी शरीर अभ्यासासाठी देहदान करण्याचा संकल्प करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी केलेला संकल्प चुट्टेवाड परिवारांनी पूर्ण केला. ते सामाजिक कार्यकर्ते सुभाष चुट्टेवाड यांचे वडील होत.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT