मराठवाडा

Nanded Crime : जुगार खेळणाऱ्या १२ जणांना अटक; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

अविनाश सुतार

हाणेगाव: पुढारी वृत्तसेवा: मरखेल पोलिसांनी बेंम्बरा तांडा येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून १२ जणांना अटक (Nanded Crime)  केली. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन कारसह ५ लाख ३७ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि.९) मध्यरात्री केली. अटक केलेल्यांमध्ये तेलंगणा व महाराष्ट्रातील व्यक्तींचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, देगलूर तालुक्यातील महाराष्ट्र- तेलंगणा सीमेलगत असेलल्या बेंम्बरा तांडा येथे एका हॉटेलजवळ कारच्या लाईटच्या उजेडात जुगार अड्डा (Nanded Crime) सुरु असल्याची माहिती मरखेल पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून मरखेल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे यांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री जुगार अड्डयावर सापळा रचून धाड टाकली.

आरोपींची नावे अशी, नरसिंगराव रामराव माली पाटील (वय 26, रा. नागमपल्ली, ता. नारायणखेड, जि. संगारेड्डी), भोजीराम पोमा नाईक राठोड (वय 35), सिद्धाप्पा संगप्पा जंगम (वय 50), नरसामल्लू गुंडाप्पा मुदिराज (वय 42, हे तिघेही रा. गाजूलपाड, ता. नारायणखेड, जिल्हा संगारेड्डी), दत्तू गुंडेराव बिरादार (वय 40, रा. चापता, ता. नारायणखेड, जि. संगारेड्डी), आकाश दत्तात्रेय पोकलवार (वय 28, रा. औराद, ता. औराद जि. बिदर), सुभाष माधवराव लादे (वय 37, रा. घुळा, ता. मदनुर, जि. कामारेड्डी), सचिन जगन्नाथ कोळी (वय 30, रा. औराद, जि. बिदर), नूर अहमद मुल्लासाब मुल्ला (वय 33, रा. येडूर बु, ता. देगलूर), महेसप्पा ईबन्ना पारशेट्टी (वय 40, रा. चोबनपल्ली, ता. नारायणखेड, जि. संगारेड्डी), राजू संगप्पा बिरादार (वय 33, रा. तडकल, ता. नारायणखेड, जि. संगारेड्डी), जगदीश रामराव जाधव (वय 38, रा. हाळी, ता. देगलूर)

पुढील तपास जमादार शेख, अहमद बारी करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT