केज (बीड) ; पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था मोडकळीस आली असून, एका महिला आमदाराला दारूच्या नशेत असलेली व्यक्ती छेड काढते. अशावेळी पोलिस यंत्रणा फोनही उचलत नाही. संबंधितांवर कार्यवाही करत नसतील तर याला काय म्हणावे?, आमदारच सुरक्षित नाहीत, मग सर्वसामान्यांचं काय? असा सवाल आमदार नमिता मुंदडा यांनी विधानभवनात केली. यावेळी त्यांनी पोलीस यंत्रणांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत शासनाने याची तीव्र दखल घ्यावी, अशी मागणी देखील केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका महिनापूर्वी आमदार नमिता मुंदडा या आपल्या कुटुंबियासोबत अंबाजोगाई येथील एका रसवंतीगृहावर गेल्या हाेत्या. येथे नशेत असलेल्या काही व्यक्तींनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा आग्रह धरला. त्या व्यक्तींची अवस्था पाहून त्यांनी यासाठी नकार दिला. संबंधित व्यक्तींनी आमदार मुंदडा यांच्याशी उद्धट वर्तन केले.त्यांनी तात्काळ पोलीस यंत्रणांना फोन केला, परंतु, पोलिस यंत्रणांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर एका आमदाराच्या संदर्भात असा घटनाक्रम घडत असताना पोलीस यंत्रणा गप्प कशी राहू शकते? असा सवाल त्यांनी विधानभवनात केला आहे.
संबंधित व्यक्ती लातूर जिल्हातील एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी असताना यंत्रणा काहीच हालचाल करत नाही, याचाच अर्थ कायदा सुव्यवस्था राहिलीच नाही, असाच होत आहे. बीड जिल्ह्यातील कायदाव्यवस्था सुरळीत होण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेच असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?