Youth arrested in Latur along with Gavathi Kattya
लातूर, पुढारी वृत्तसेवा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेऊन शस्त्र हस्तगत केले. चंद्रकांत हरिबा शिंदे (वय २६), असे आर-ोपीचे नाव आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी (दि. १८ सप्टेंबर) दुपारी ही कारवाई केली.
गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गांजरखेडा, तालुका औसा येथील चंद्रकांत हरिबा शिंदे (वय २६) यास बसस्थानक परिसरातून पकडले. त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा (पिस्तूल) हस्तगत करण्यात आला. कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक माणिक डोके, सफौ. सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार गोविंद भोसले, राजेश कंचे, विनोद चलवाड, चंद्रकांत डांगे, प्रशांत स्वामी, महादेव शिंदे, तुळशीराम बरुरे, बंडू नीटुरे यांनी सहभाग नोंदविला.