Crime News pudhari photo
लातूर

Udgir crime : नावंदीच्या शेतात ‘तिर्रट’ जुगारावर छापा;मुद्देमाल जप्त

एकूण १५ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

उदगीर : स्थानिक गुन्हे शाखेने नावंदी (ता. उदगीर) येथील एका शेतात सुरू असलेल्या ‘तिर्रट’ जुगारावर छापा टाकला. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन आणि वाहनांसह एकूण १५ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच चार जण पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

नावंदी गावातील एका शेतातील चिंचेच्या झाडाखाली मोकळ्या जागेत काही जण ‘तिर्रट’ जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पथकाने तेथे अचानक छापा टाकला. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच काही जण घटनास्थळावरून पळून गेले.

मात्र, माधव भुजंग मोतेवाड (वय ४५, रा. सोमनाथपूर, उदगीर), आसीफ सिकंदर मजकुरी (वय २७, रा. लासूना, ता. देवणी, ह.मु. बनशेळकी रोड, उदगीर), सुदर्शनदेव मुलशंकर कापसे (वय २४, रा. नळगीर, ता. उदगीर), महेबुब युसुफ शेख (वय ३९, रा. नळगीर, ता. उदगीर) आणि बालाजी गोविंदराव गुट्टे (वय ७२, रा. गुट्टेवाडी, ता. उदगीर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

तसेच गणेश बालाजी पेदेवाड (रा. नळगीर), अली हैदर बागवान (रा. बनशेळकी रोड, उदगीर), सदा राठोड (रा. सुल्लाळी तांडा, ता. जळकोट) आणि बस्वराज ऊर्फ राजू मिंचे (रा. उदगीर) हे चौघे पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

कारवाईत जुगाराचे पत्ते, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच जुगारासाठी वापरण्यात आलेली वाहने असा एकूण १५ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पुढील तपास वाढवणा पोलिस ठाण्याचे पथक करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT