उदगीर नगरपरिषदेचा अतिक्रमणावर हातोडा  pudhari photo
लातूर

Encroachment Drive Udgir : उदगीर नगरपरिषदेचा अतिक्रमणावर हातोडा

नागरिकांतून होतेय स्वागत; बागवानांतून नाराजी

पुढारी वृत्तसेवा

उदगीर :उदगीर नगर परिषदेच्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर नूतन नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी यांच्या आदेशानुसार उदगीर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे. उदगीर शहरात वाढलेले अतिक्रमण आणि रस्त्याच्या दुतर्फा थांबणारे हातगाडी आणि ठेलेवाले यांच्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत होता. या संदर्भामध्ये वेळोवेळी ओरड करून देखील या गोष्टीकडे फारसे कोणी लक्ष देत नव्हते. मात्र निवडणुका झाल्यानंतर नगरपालिकेकडून मोठा निर्णय घेऊन अतिक्रमण हटाव ची मोहीम राबवली जात आहे.

उदगीर येथील भाजी मंडई परिसरात संध्याकाळच्या वेळी महिलांना आणि मुलींना भाजी घेण्यासाठी बाजारात जाणे देखील कठीण झाले होते. दुकानदाराचे दुकान समोर झालेले अतिक्रमण आणि दुसऱ्या बाजूला हातगाडीवाले, ठेलेवाले यांची गर्दी त्यातही रस्त्याच्या मध्यभागी करण्यात आलेली दुचाकीची पार्किंग यामुळे रस्ता अत्यंत अरुंद झाला होता. त्या रस्त्याला मोकळा श्वास घेण्याची संधी आता अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे मिळू शकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

एका बाजूला या अतिक्रमण हटामुळे काही लोक समाधान व्यक्त करत आहेत. तर काही लोक गोरगरिबांच्या रोजी रोटी वर गदा आणला जात आहे अशी उरळी करत आहेत. काही कार्यकर्त्यांनी तर चक्क अतिक्रमण हटाव ची खरी गरज मुख्य रस्त्यावर शिवाजी चौकात आणि पोलीस स्टेशन समोर किंवा डॉ. जाकिर हुसेन चौक अर्थात जुना उमा चौक या ठिकाणी सतत वाहतूक तुंबलेली दिसून येते. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा होत आहे. त्या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम न राबवता गल्लीबोळातील आणि भाजी मार्केट परिसरातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाले असल्याने अनेक बागवानांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

समाजसेवी संस्था आणि काही नागरिकांनी नगर परिषदेच्या या अतिक्रमण हटाव मोहिमेचे कौतुकही केले आहे. “स्वच्छ उदगीर, सुंदर उदगीर, हरित उदगीर“ या कल्पना नूतन नगराध्यक्ष सौ. स्वाती सचिन हुडे यांनी यापूर्वीही बोलून दाखवल्या होत्या. त्याप्रमाणे ही कारवाई केली जात असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.

  • उदगीर नगरपरिषद अतिक्रमण हाटावा मोहिमेत , धन दांडग्याचे अतिक्रमण सोडून गोरगरिबांच्या अतिक्रमणावर बुलडोझर चालवल्यामुळे गरीब हात गाडीवाले व्यावसायिक यांच्यावर एका प्रकारे अन्याय झाला असल्याचे शहरात चर्चा चालू आहे, शिवाजी चौक देगलूर रोडवरील अतिक्रमण का? काढले जात नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT