Udgir Agriculture News pudhari photo
लातूर

Latur News : पावसाअभावी शेतकरी चिंताग्रस्त; पेरणी कधी होणार?

उदगीर : जून महिना अर्धा संपला तरीही उन्हाचे चटके कायम

पुढारी वृत्तसेवा

जावेद शेख

उदगीर : जून महिना अर्धा संपत आला असतानाही उदगीर तालुक्यात उन्हाचा कडकडाट कायम आहे मान्सूनच्या अशाने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

जून महिना अर्धा संपत आला असतानाही उदगीर तालुक्यात उन्हाचा कडाका कायम आहे. मान्सूनच्या आगमनाकडे शेतकर्‍यांचे डोळ लागले असतानाही अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे. पेरणी हंगाम तोंडावर आला असूनही पावसाने हुलकावणी दिल्याने शेतीची कामे रखडली आहेत. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी खते व बिषाणे खरेदी करून घरी आणून ठेवले आहेत,

पाऊस पडताच पेरणीला सुरुवात करण्याची तयारी त्यांनी पूर्ण केली आहे. मात्र, जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणी करणे धोक्याचे ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या दिवसभर प्रखर ऊन पडत असून उष्णतेमुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर व बाजारपेठेत तुलनेने कमी वर्दळ दिसून येत आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढली आहे. उदगीर तालुक्यासह परिसरात पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी लावली नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

सुरुवातीला काही भागांमध्ये चांगला पाऊस पडला मात्र यानंतर पावसाने उघडीप दिली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. अनेक शेतकऱ्याऱ्यांनी खते व बियाण्यांची तयारी करून ठेवली असली तरी पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. पुरेसा पाऊस होवा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. मुगाची पेरणी मृग नक्षत्रामध्ये होणे गरजेचे उदगीर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी मूग उडीद सोयाबीन या पिकाची लागवड करतात. मात्र यावधी मृग नक्षत्रामध्ये म्हणावा तसा पाऊस पडला नाही. यामुळे मुगाची पेरणी रखडली आहे.

मुगाची पेरणी मृग नक्षत्रामध्ये होण गरजेचे आहे. मृग नक्षत्रामध्ये मूग, उडीद या पिकांची पेरणी झाली, तरच मूग-उडीद पिकाचे उत्पादन चांगले मिळते अशी शेतकर्‍यांची धारणा आहे. यासोबतच मुगाची पेरणीदेखील मृग नक्षत्रामध्येव व्हावी लागते. परंतु आता अपां गग नक्षत्र संपला तरीही पाऊस झाला नसल्यामुळे पेरणीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कृषी तज्ञांच्या मते, मान्सून सक्रिय झाल्यानंतर चांगला पाऊस झाल्यास पेरणीला वेग येईल. मात्र पावसाचा आणखी विलंब झाल्यास खरीप हंगामाच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह व्यापारी आणि कृषी विभागाचे अधिकारीही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

  • दरम्यान, हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून लवकरात लवकर समाधानकारक पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामाची सर्व तयारी पूर्ण असतानाही पावसाअभावी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT