हटकल्याचा राग मनात धरून कारची मोटारसायकलला धडक; दोन ठार File photo
लातूर

हटकल्याचा राग मनात धरून कारची मोटारसायकलला धडक; दोन ठार

पुढारी वृत्तसेवा

औसा, पुढारी वृत्तसेवा : लातूर-औसा रोडवर रात्री आठच्या सुमारास आपल्या ताब्यातील फोर्ड कार बेदकारपणे चालवीत होते. तेव्हा मोटारसायकल चालकाने गाडी नीट चालवा म्हणून हटकल्याचा राग मनात ठेवून फोर्ड कारने मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात मोटारसायकलवर असलेल्या चौघांपैकी दोघे जण ठार तर दोघांना जखमी केल्याप्रकरणी पाच जणाविरोधात औसा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूर येथील सादीक उस्मान शेख हे आपल्या मोटारसायकल क्र. एमएच १३- सीई ७२३३ वरून आपल्या कुटुंबीयांसह औसा येथून लातूरकडे जात होते. बुधोडा ते पेठ दरम्यान एमएच ४४-जी-०३७० ही फोर्ड कार कारचालक वेडीवाकडी चालत होता.

सादीक यांनी त्यांना गाडी नीट चालवा, वेडीवाकडी का चालविता? असे हटकल्याचा राग मनात ठेऊन कारचालकाने जाणीवपूर्वक मोटारसायकलला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यात इकरा सादीक शेख (वय २४), नादिया सादीक शेख (वय ३) हे मयत झाले. तर स्वतः सादीक उस्मान शेख व आहाद सादीक शेख (वय ६) हे जखमी झाले.

या प्रकरणी औसा पोलिसांत कारमधील दिगंबर पांडोळे, कृष्णा ऊर्फ विजय वाघे, बसवराज ऊर्फ प्रल्हाद धोत्रे, मनोज माने व मुदामे या आडनावाच्या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT