पुढारी टॅलेंट सर्च विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावेल file photo
लातूर

पुढारी टॅलेंट सर्च विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावेल

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास; गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक

पुढारी वृत्तसेवा

The Pudhari Talent Search will contribute to the bright future of students

लातूर, पुढारी वृत्तसेवा स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे, बुध्दीमतेच्या बळावर आपल्या भविष्याची पायाभरणी करीत देश व जगाच्या प्रगतीसाठी पुढे त्यांनी योगदान दिले पाहिजे, या उदात्त हेतूने पुढारी समूहाने लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांतील ५ वी ८ वीतील विद्यार्थ्यांसाठी घेतलेली पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सहाय्यभूत ठरेल, स्पर्धा परीक्षा देणायासाठी प्रेरणा देईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.

लातूर जिल्हा परिषद व पुढारी माध्यम समूहाच्या वतीने घेण्यात आलेल्या या परी क्षेतील ६६ गुणवंत विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील विविध ठिकाणी गौरविण्यात आले. वातील जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार प्रातीनिधीक रूपात पालकमंत्री भोसले यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १मे) करण्यात आला.

मुख्यालय प्रांगणात मुख्य शासकीय राष्ट्रध्वज बंदन समारंभात झालेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमारमीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, मनपा आयुक्त मानसी मीना, अप्पर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर उपविभागीय अधिकारी रोहिणी बिरोळे, उपजिल्हाधिकारी सावली ठाकूर, जिल्हा नियोजन अधिकारी रेड्डी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप,

कोल्हापूर पुढारीचे वितरण व्यवस्थापक, अशोक पाटील, पुढारीचे लातूर जिल्हा प्रतिनिधी शहाजी पवार, बितरण व जाहिरात प्रतिनिधी राजामाऊ जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माध्यम क्षेत्रामध्ये स्वतंत्र ओळख देणाऱ्या पुढारी समूहाने सामाजिक बांधिलकीतही आपली वेगळी ओळख दिली आहे.

नैसर्गीक आपत्ती तसेच विविध संकटाच्या काळात हा समूह नागरिकांच्या पाठीशी राहिला आहे. सियाचीन येथे सैनिकांसाठी उभारण्यात आलेले रुग्णालय हा देशसेवेचा एक वस्तुपाठच ठरला आहे. आज ग्रामीण भागातीलअनेक विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळात शिक्षण घेतात,

त्यांच्या अंगी गुणवत्ता असते तिची अभिव्यक्तीकरण्यासाठी त्या विद्याथ्यांना सशक्त व्यासपीठ मिळाले तर ते आपली गुणवत्ता सिध्द करतात नेमके हे हेरुन पुढारी टॅलेंट सर्चच्या माध्यमातून पुढारी समूहाने ते त्यांना दिले आहे.

विशेष म्हणजे त्यांनी बारा हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका व सरावसंच दिले आहेत याचे मोठे समाधान वाटते. विद्याथ्यर्थ्यांसाठी पुढारीने ग्रामीण भागातील विद्याथ्यांसाठी राबवलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. तो विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवण्यास निश्चितच साहाय्यभूत ठरेल असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री भोसले यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांना व त्यांच्या पालकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी यां या विद्यार्थ्यांची संवाद साधला त्यांच्या पाठीवर हात फिरवला तुमचे अभिनंदन मोठे व्हा जिल्ह्याचे देशाचे नाव

पालकमंत्र्यांनी यां या विद्यार्थ्यांची संवाद साधला त्यांच्या पाठीवर हात फिरवला तुमचे अभिनंदन मोठे व्हा जिल्ह्याचे देशाचे नाव उज्वल करा असे ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री व विद्यार्थ्यांच्या चेहर्याबर उमटेलेले गोड स्मित सुखावणारे होते.

यांचे झाले कौतुक

चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिवनखेड येथील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी आदिमा रफीक सय्यद, उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला वाढवणा येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी पूनम प्रवीण कोडे व रेणापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवीची आठवीची विद्यार्थिनी कार्तिकी रामराव आधव यांना पुढारीच्या वतीने गौरव चिन्ह व रोख पारितोषिक देऊन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी या विद्याथ्यांचे पोलक व गुरुजन उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT