NEET scam
NEET scam  
लातूर

पेपरफुटीचे कनेक्शन महाराष्ट्रापर्यंत!; लातूरला २ शिक्षक 'एटीएस'च्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

पाटणा/लातूर : वृत्तसंस्था/पुढारी वृत्तसेवा : नीटमधील (वैद्यकीय प्रवेश परीक्षा) पेपरफुटी तसेच गैरप्रकारांची चौकशी करत असलेल्या पाटणा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने महाराष्ट्रातील एका परीक्षार्थीला चौकशीस हजर राहण्याची नोटीस पाठविली होती. नीट पेपरफुटीचे कनेक्शन अशा प्रकारे महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेलेच होते. आता खासगी शिकवण्यांचा कारखाना बनलेल्या लातूरला ते भिडले आहेत.

तपास सीबीआयकडे

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविताच नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतले आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखान पठाण अशी अटकेतील शिक्षकांची नावे आहेत.

नांदेड एटीएसची कारवाई

लातूरमध्येही नीट व जेईईच्या तयारीसाठी विद्यार्थी खासगी शिकवण्यांत प्रवेश घेत असतात. शनिवारी रात्री नांदेड एटीएसने ही कारवाई केली. सध्या लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवासी आहेत. सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते कार्यरत आहेत. लातूरच्या अंबाजोगाई रोड भागातील रहिवासी जलील उमरखान पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.

नीट पेपरफुटी रॅकेट

संजय जाधव व जलील उमरखाँ पठाण हे दोघेही पीएचडीधारक आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षक असले तरी ते लातूरमध्ये खासगी शिकवणीही घेतात. नीटच्या पेपरफुटी रॅकेटमध्ये त्यांचाही सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

SCROLL FOR NEXT