'मायलेक' उपक्रम उत्साहात; मुली असलेल्या जन्मदात्यांचा सन्मान file photo
लातूर

'मायलेक' उपक्रम उत्साहात; मुली असलेल्या जन्मदात्यांचा सन्मान

लातूर येथील सूळ हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मायलेक उपक्रम उत्साहात पार पडला.

पुढारी वृत्तसेवा

The 'Mother-Daughter' initiative was held with great enthusiasm; mothers with daughters were honored

लातूर, पुढारी वृतसेवा : लातूर येथील सूळ हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मायलेक उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात मुलींचे सक्षमीकरण, आत्मविश्वास वृद्धी तसेच सुरक्षित व सन्मानपूर्ण वातावरण निर्मितीवर भर देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी मुलींना योग्य संधी व शिक्षण मिळाल्यास त्या समाजाच्या विकासात मोलाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमप्रसंगी केवळ मुली असलेल्या कुटुंबातील महिला पालकांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे उपस्थित महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. अभय कदम यांनी मुलींच्या शारीरिक व मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन करत पालक व समाजाची जबाबदारी स्पष्ट केली.

तर डॉ. ज्योती राहुल सूळ यांनी मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकास, आत्मसन्मान व भविष्यातील संधी यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास दोन मुली असलेल्या पालकांचा, विशेषतः महिलांचा, मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सूळ हॉस्पिटलमध्ये केवळ मुली असलेल्या दाम्पत्यांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच महिलांसाठी शिवणकाम, व्युटी पार्लर, हेल्थ सर्व्हिसेस व संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच मुलींना पूर्वप्राथमिक शैक्षणिक मदत दिली जाणार आहे.

वीरमाता व वीरपत्नी यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता मदने यांनी केले तर आभार डॉ. राहुल सूळ यांनी मानले. यावेळी डॉ. अर्चना कोंबडे, डॉ. माधुरी कदम, डॉ. प्रियांका डावळे, स्वप्ना गोजमगुंडे, वर्षा शिंदे, डॉ. श्वेता भांताब्रे, शोभा माने, डॉ. अनिता साळुंके, डॉ. नीलम पन्हाळे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT