Retro look trend : '८० एस'च्या जादूने सोशल मीडिया रंगला; एआयच्या रेट्रो फोटोंचा धुमाकूळ  file photo
लातूर

Retro look trend : '८० एस'च्या जादूने सोशल मीडिया रंगला; एआयच्या रेट्रो फोटोंचा धुमाकूळ

मंत्री, आमदार, खासदारांपासून सीने जगत, उद्योजकांपर्यंत सर्वांनाच जुन्या लूकची भुरळ

पुढारी वृत्तसेवा

The magic of the '80s colored social media; AI's retro photo shoot

गोरख भुसाळे

किनगावः आजच्या आधुनिक जगात वावरणारे चेहरे अचानक १९८०च्या दशकातील दिसू लागले आणि सोशल मीडियावर या 'रेट्रो लूक'ची अक्षरशः लाट आली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने आपले सध्याचे छायाचित्र १९८०च्या दशकातील रूपात बदलण्याचा 'चॅट जीपीटी ८० एस एआय फोटो ट्रेंड' बुधवारी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. फेसबुक, इन्स्टाग्रामसह विविध समाजमाध्यमांवर दिवसभर या छायाचित्रांचीच चर्चा होती.

एआयच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या या छायाचित्रांमध्ये १९८०च्या दशकातील रंगीबेरंगी शर्ट, जुन्या पद्धतीच्या केशरचना, त्या काळातील वाहन, इमारती आणि छायाचित्र काढण्याच्या वेगवेगळ्या पोझचा वापर केला जात आहे.

त्यामुळे सध्याच्या काळातील 19805 TREND उदगीर UDGIR उदगीर व्यक्ती थेट चार दशकांपूर्वीच्या काळात पोहोचल्याचा भास निर्माण होत आहे. विशेष म्हणजे हा ट्रेंड केवळ सर्वसामान्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही.

मंत्री, आमदार, खासदार, राजकीय नेते, कार्यकर्ते, अभिनेते-अभिनेत्री तसेच मोठ्या उद्योजकांनीही एआयच्या माध्यमातून आपले '८० एस' लूकमधील छायाचित्र तयार करून समाजमाध्यमांवर पोस्ट केले आहेत. या पोस्टवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया, पसंती आणि शेअरिंग 80's Vibes होत असल्याने ट्रेंडची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. जुन्या काळातील छायाचित्रांची आठवण आणि नव्या तंत्रज्ञानाची भन्नाट सांगड या ट्रेंडमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे 'आपण १९८०च्या दशकात असतो तर कसे दिसलो असतो?'

याची उत्सुकता अनेकांना लागली असून, प्रत्येक जण आपल्या छायाचित्राचा रेट्रो अवतार पाहण्यासाठी एआयचा आधार घेत आहे. सोशल मीडियावर सध्या या '८० एस' फोटोंनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT