The Latur mayoral post has been reserved for the first time for a woman from the Scheduled Castes category
लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर शहर महानगरपालिचा सहावा महापौर कोण होणार, याची प्रतीक्षा आता संपली आहे. मुंबईत गुरुवारी (दि. २२) दुपारी नगरविकास मंत्रालयात आरक्षण सोडतीत लातूरचे महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलेसाठी आरक्षित झाले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या काँग्रेसकडे तीन आणि वंचित बहुजन आघाडीकडे दोन महिला नगरसेविका असल्याने या पाचही महिला महापौर पदाच्या प्रबळ दावेदार आहेत. काँग्रेसचे सर्वाधिक ४३ नगरसेवक असल्यामुळे काँग्रेसच्या तीन महिला नगरसेविकांपैकी एक महापौर होईल, अशी शक्यता आहे.
लातूर शहर महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होऊन १६ जानेवारीला मतमोजणीअंती लातूरकरांनी काँग्रेस ४३ व वंचित बहुजन आघाडीला ३ अशा एकूण ४७ जागांवर बहुमताचा कौल दिला. तर भाजप २२ जागा जिंकून दुसऱ्या स्थानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार) एक सदस्य विजयी झाला आहे. महापालिकेच्या तेरा वर्षांच्या इतिहासात पाच महापौर झाले आहेत यामध्ये दोन महापौर खुल्या प्रवर्गातून झाले, यामध्ये एक महिला आहे. तर ओबीसीचे तीन पुरुष महापौर बनले आहेत.
रोटेशन पद्धतीनुसार सहाव्या महापौर पदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाला महापौर पदाचे आरक्षण सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. शासनाने २२ जानेवारी रोजी मंत्रालयात नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत महापौर पदांचे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये लातूर महापालिकेचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी निघाले. त्यामुळे सहावा महापौर म्हणून अनुसूचित जाती प्रवर्गाची महिला विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. या सोडतीमुळे महापौर पदासाठी पाच महिला उमेदवार दावेदार ठरले आहेत. काँग्रेस पक्षाच्या तीन महिला आणि वंचित बहुजन आघाडीच्या दोन महिला या प्रवर्गातून विजयी झालेले आहेत.
मिसाळ यांच्या उपस्थितीत महापौर पदांचे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये लातूर महापालिकेचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी निघाले. त्यामुळे सहावा महापौर म्हणून अनुसूचित जाती प्रवर्गाची महिला विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. या सोडतीमुळे महापौर पदासाठी पाच महिला उमेदवार दावेदार ठरले आहेत. काँग्रेस पक्षाच्या तीन महिला आणि वंचित बहुजन आघाडीच्या यामध्ये काँग्रेसच्या प्रभाग ३ मधून मनीषा संभाजी बसपुरे, प्रभाग १० मधून कांचन रत्नदीप अजनीकर व प्रभाग १२ मधून जयश्री भालचंद्र सोनकांबळे यांचा समावेश आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग २ मधून अंकिता प्रशांत भडीकर आणि प्रभाग ७ मधून निकिता रोहित सोमवंशी यांचा समावेश आहे.
आमदार अमित देशमुखांकडे सर्वाधिकार
काँग्रेसचे संख्याबळ ४३ असल्याने महापौर काँग्रेसचाच होईल, हे स्पष्ट आहे. महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालायची, याचे सर्व सर्वाधिकार आमदार अमित देशमुख यांना आहेत. त्यामुळे दावेदार नगरसेविकांनी आतापासूनच जोरदार फील्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.