The defeated candidate held a rally at Nilanga
निलंगा, पुढारी वृतसेवा : सर्वसाधारणपणे निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार त्यांच्या विजयाचा जल्लोष ढोल ताशाच्या गजरात, मिरवणुकांच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. पराभूत उमेदवार मात्र निराश होऊन एकांत पसंत करतात तथापि या रहाटीला छेद देण्याचे काम निलंगा पराभवाला शहरात नगरपरीषदेच्या निवडणुकीत सामोरे गेलेल्या भाजपाच्या एका उमेदवाराने कृतज्ञता रॅली काढून केले आहे. किशोर लंगोटे असे त्यांचे नाव आहे.
किशोर लंगाटे यांनी निलंगा नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपाच्या वतीने निवडणूक लढवली होती. तेथे लढत चुरशीची झाली. यात अवघ्या २० मतांनी किशोर यांचा पराभव झाला. हा पराभव अर्थात जनतेने दिलेल्या कौल विनम्रपणे स्वीकारत त्यांनी त्यांना मतदान केलेल्या मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
पराभवाने खचून न जाता थेट जनतेत उतरून आभार रॅली काढली आणि नागरिकांशी संवाद साधाला. नगरसेवक झालो नाही, तरी जनसेवक म्हणून अखंड काम करत राहणार असा निर्धार किशोर लंगोटे यांनी यावेळी व्यक्त केला.
नागरिकांनीही त्यांचे स्वागत केले. त्यांनी दादा खचून जाऊ नका, असा धीरही दिला. प्रभागात काढलेल्या आभार रॅलीला समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती. पराभवातही सकारात्मक भूमिका, आणि समाजसेवेची दिशा कायम ठेवण्याच्या त्यांच्या भूमिकेचे शहरभर कौतुक होत आहे.
राजकारणात विजय-पराभव येतात पण जनतेशी नाते कायम ठेवणे हेच लोकांनी लोकासाठी चालवेल्या राज्याचे अर्थात लोकशाहीची ओळख असते हेच किशोर यांच्या या बांधिलकीने पुन्हा अधोरेखित केले आहे.