Suraj Chavan promoted to NCP state general secretary
लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना लातूर येथे छावाचे पदाधिकारी विजय घाडगे यांना मारहाण केल्यामुळे पक्षातून निलंबित करण्यात आले होते. निलंबनाला पंधरा दिवस उलटच नाही तोच पक्षाने सूरज चव्हाण यांना पक्षासाठी केलेल्या मारहाणबिद्दल बक्षिसी दिली आहे. त्यांना प्रदेश सरचिटणीसपदी बढती देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे पंधरा दिवसांपूर्वी लातूर दौऱ्यावर असताना छावाचे पदाधिकारी विजय घाडगे व त्यांचे सहकाऱ्यांनी तटकरे यांच्यावर पत्ते उधळले होते. हे पाहून तेथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजय घाडगे यांना बेदम मारहाण केली.
या मारहाणीचे राज्यभरात पडसाद उमठले. त्यानंतर चव्हाण यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्यात आली. निलंबनाच्या कारवाईला पंधरा दिवस उलटत नाही तोच पक्षाने चव्हाण यांना आता मुख्य कार्यकारीणीत स्थान दिले आहे. केवळ स्थानच दिले नाहीतर प्रदेश सरचिटणीस अशी बढती देण्यात आली आहे. सूरज चव्हाण यांनी नेत्यांनसमोर आपण पक्षासाठी काहीही करू शकतो हे दाखवून दिल्यामुळेच त्यांना बढतीचे बक्षीस मिळल्याची चर्चा आहे.