

लातूर : स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या लातूर येथील पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी जाहीर कार्यक्रम आटोपून विमानतळाकडे निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी गाडीचा ताफा थांबवून एक हृदयस्पर्शी क्षण अनुभवला.
रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या बालचित्रकार (दिव्यांग) विश्वजीत बालाजी सेलूकर याच्या हातातील मुख्यमंत्र्याचे रेखाटलेले स्केच हातात घेवून त्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्याने काढलेले हे चित्र मुख्यमंत्र्यांना भावले व ते चित्र काळजीपूर्वक पाहत शाब्बासकीची व कौतुकाची थाप दिली. या प्रकारामुळे उपस्थितांसह अनेकजण भारावून गेले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुतळा अनावरण प्रसंगीच्या जाहीर कार्यक्रमात या छोट्या चिमुकल्याने मुख्यमंत्र्याचे काढलेले स्केच सभेमध्ये उंचावून दाखवले.
त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्याला हात दाखवून भेट घेण्याचा सूचक इशारा केला. त्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांच्या कडक सुरक्षेततही त्याला पोहचता तिथपर्यंत पोहचता न आल्याने त्याने रस्त्याच्या कडेला थांबून आपल्या हातातील स्केच मुख्यमंत्र्यांना दाखवत असताना मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवून विश्वजीतच्या या कलेचे कौतुक केले व तू खूप चांगलं काम करतोयस, असेच पुढे जात राहा असा आशीर्वादही दिला. या आशीर्वादामुळे भारावलेल्या विश्वजीतने त्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण पुढील वाटचालीस प्रेरणादायी ठरेल. हा कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः हा स्केच समाजमाध्यावर व्हायरल केला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे दयानंद महाविद्यालयातील मैदानावरील उपस्थितांसह विश्वजीतच्या आई-वडिलांनाही आपल्या मुलाच्या कार्याचा आनंद झाला.