Soybean prices increased at the end of the year.
विठ्ठल कटके
रेणापूर : अतिवृष्टीमुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात ४० ते ५० टक्के घट झाल्याने - शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मागील - वर्षभरात सोयाबीनचे भाव चार साडेचार हजार रुपयांवरच स्थिर राहिले डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यात बाजारात सोयाबीनचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना कांही अंशी आर्थिक लाभ होत आहे.
शासनाच्या हमी भाव केंद्रावरील व खुल्या बाजारातील दर पाहता प्रति क्लिंटल साडे तीन ते चारशे रुपयांचा फरक दिसून येत आहे. सध्याची आवक मर्यादित राहिली आणि मागणी वाढली तर बाजारात आणखी भाव वाढून ते हमौ भावापर्यंत जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे यावर्षी अतिवृष्टीने रेणापूर तालुक्यातील बहुतांश गावच्या शेतकऱ्यांचे सोयाबीन अनेक दिवस पाण्यातच होते तर नदीकाठच्या शेकडो शेतकऱ्यांचे सोयाबीन पुरात वाहून गेले. कांही ठिकाणच्या सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. २०२१-२२ मध्ये सोयाबिनचे भाव प्रति क्विंटल दहा हजारांपर्यंत गेले होते. त्यानंतर ते चार ते साडेचार हजारांवरच स्थिरावले.
या वर्षी उत्पादन कमी झाल्याने सोयाबीनचे भाव वाढतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती त्यानुसार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे सध्या चार हजार ९०० रूपयांपर्यंत स्थिरावले आहेत. आधारभूत खरेदी केंद्रावर ३१ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत होती. परत ती ३१ जानेवारी पर्यंत वाढविण्यात आली आहे.
मागील वर्षी नोंदणी करूनहि शेकडो शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे माप झाले नव्हते. केंद्रावर निर्माण झालेली परिस्थिती पाहता यावर्षीही नोंदणी केलेल्या सोयाबीनची शासनाकडून खरेदी होईल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. शासनाने सोयाबीनला प्रति क्विंटल ५ हजार ३२८ रुपये जाहिर केला. एकीकडे या वर्षी सोयाबीनचे उत्पादन कमी तर दुसरीकडे त्याचे भावही कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांना याचा दुहेरी फटका बसत आहे. या वर्षी सोयाबीन पावसात भिजल्याने हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकले जात आहे. सरकारने हमी भाव खरेदीच्या नियमामध्ये बदल केल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. प्रत्यक्षात ऑनलाईन नोंदणीसाठी विलंब झाला जाचक नियम व अटी यामुळे खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
सोयाबीनची म्हणावी तशी नोंदणी झालेली नाही. यंदा सोयाबीनचे उत्पादन घटल्याने सोयाबीनचे भाव वाढतील असा अंदाज होता तो सफल होत असल्याचे दिसत आहे. ओलावा आणि डॅमेज ही कारणे पुढे करून हमी भाव केंद्रावर अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले जात नाही. परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने खुल्या बाजारात कमी दराने सोयाबीनची विक्री करावी लागली.