जीवन गव्हाणे pudhari photo
लातूर

Latur News : पळशी येथील शेतकऱ्याने जीवन संपवले

आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने तालुक्यात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

रेणापूर : रेणापूर तालुक्यातील पळशी येथील शेतकरी जीवन गव्हाणे ( ६५ ) यांनी खासगी सावकाराच्या कर्जबाजारीला कंटाळून मंगळवारी रात्री झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चार दिवसांपूर्वीच रेणापूरच्या एका शेतकऱ्यांने अशाच प्रकारे कर्जाला कंटाळूनच आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

दुष्काळी परिस्थिती, शेतीचे नुकसान, खासगी सावकरांकडून काढलेल्या कर्जाचा वाढता बोजा आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी मोठ्या संकटातून जात आहेत. संकटाच्या काळात शासनाने शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना तातडीने आवश्यक मदत व दिलासा देण्याची मागणी वाढत आहे.

पळशी येथील जीवन किशन गव्हाणे यांनी एका खासगी सावकाराकडून शेतीसाठी कर्ज काढले होते. सततच्या नापिकीमुळे त्यांना कर्ज फेडता आले नाही. तिकडे खाजगी सावकाराचा कर्ज मागणीचा तगादा सुरुच होता. असे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. मंगळवारी दुपारी खाजगी सावकाराने कर्जाची मागणी केली त्यानंतर जीवन किसन गव्हाणे हे ताण तणावतच होते असे बोलले जात आहे. मंगळवारीच रात्री त्यांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली.

मयत जीवन गव्हाणे यांची कांही जमिन तळ्यात गेली होती त्यांच्याकडे अवघी पंधरा ते वीस गुंठेच जमिन होती त्यावरच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालत होता. पळशी पासून जवळच त्यांची व त्यांच्या चुलत्याची जमिन आहे शेताकडे जाणाऱ्या रस्त्यालगत झाडाला त्यांनी गळफास घेतला. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व दोन मुले आहेत.

पोलिसांनी या प्रकरणी रितसर पंचनामा करून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. बुधवारी त्यांच्या पार्थावावर पळशी येथे अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT