निलंगा व उदगीर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान ट्रॉफी देऊन करण्यात आला Pudhari
लातूर

Pudhari Talent Search 2026 | ‘पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा’: निलंगा, उदगीर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

Nilanga student award ceremony

निलंगा/उदगीर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ‘पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा २०२६’ अंतर्गत निलंगा व उदगीर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान ट्रॉफी देऊन करण्यात आला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.

निलंगा येथे पंचायत समिती सभापती डॉ. सुनीता वाघमारे, उपसभापती अश्विनी माने, गटविकास अधिकारी सतीश पाटील, शिक्षणाधिकारी संतोष स्वामी, नगराध्यक्ष संजय हलगरकर, नगरसेवक हरिभाऊ सगरे आदींसह अनेक मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रथम क्रमांकासाठी ५ हजार, द्वितीयसाठी ३ हजार आणि तृतीयसाठी २ हजार रुपये असे रोख पारितोषिक दैनिक ‘पुढारी’च्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, उदगीर येथेही अशाच पद्धतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. पंचायत समिती सभापती वनमाला तातेराव रेड्डी, उपसभापती व्ही. के. भोसले, गटविकास अधिकारी सुरडकर, पंचायत समिती सदस्य भास्कर जाधव, बालाजी अंधारे, प्रकाश बिरादार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT