Latur News : उपवर्गीकरणा विरोधात निलंग्यात एल्गार; लातुरात महामोर्चाचे आयोजन file photo
लातूर

Latur News : उपवर्गीकरणा विरोधात निलंग्यात एल्गार; लातुरात महामोर्चाचे आयोजन

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, निलंगा यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, निलंगा येथे बैठक पार पडली. बैठकीत उपवर्गीकरणाच्या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली

पुढारी वृत्तसेवा

Protest against sub-categorization in Nilanga; massive rally organized in Latur.

निलंगा, पुढारी वृत्तसेवा : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, निलंगा यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, निलंगा येथे बैठक पार पडली. बैठकीत उपवर्गीकरणाच्या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच ६ जुलै रोजी लातूर येथे होणारा जिल्हास्तरीय महामोर्चा अभूतपूर्व करण्याचा निर्धार करण्यात आला.

बैठकीत उपस्थित विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींनी अनुसूचित जातींच्या घटनात्मक अधिकारांवर कोणताही आघात सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या एकात्मतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत, संविधानाने दिलेल्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना धक्का पोहोचेल, अशी भूमिका मांडण्यात आली.

त्यामुळे महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरणाच्या दिशेने कोणतीही घाईगडबडीची पावले उचलू नयेत, संबंधित समाजघटकांशी व्यापक चर्चा करावी आणि निर्माण झालेला संभ्रम दूर करावा, अशी ठाम मागणी बैठकीत करण्यात आली. बैठकीत निलंगा शहर व तालुक्यातील प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने महिला, युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी लातूरच्या महामोर्चात सहभागी व्हावे, यासाठी जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस विलास सूर्यवंशी, अंकुश ढेरे, प्रा. रोहित बनसोडे, दाजीबा कांबळे, अर्जुनाप्पा कटके काशिनाथ जाधव शरद पेठकर, धम्मानंद काळे, प्रकाश गायकवाड, प्रकाश कांबळेयांच्यासह विविध समाजघटकांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT