सोशल मीडियावर बनावट एजंटांचा सुळसुळाट file photo
लातूर

Fake Agents : सोशल मीडियावर बनावट एजंटांचा सुळसुळाट

आष्टी : आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नसल्याची पोस्ट

पुढारी वृत्तसेवा

Proliferation of fake agents on social media

आष्टी, पुढारी वृत्तसेवा : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात सध्या सोशल मीडियावरील विविध ग्रुपमध्ये आरटीओच्या कामांसंदर्भात जाहिरातींचा सुळसुळाट झाला आहे. 'आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही, घरबसल्या योग्य दरात काम करून मिळेल', अशा आशयाच्या पोस्ट टाकून नागरिकांना आकर्षित केले जात असल्याचे दिसून येत आहे. या माध्यमातून अनेक नागरिकांची दिशाभूल होऊन काहींना आर्थिक गंडाही घातला गेल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये टू-व्हीलर व फोर-व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नावावर करणे, वाहन ट्रान्सफर, ट्रान्सपोर्ट लायसन्स, पीयूसीसह आरटीओशी संबंधित विविध कामे अगदी कमी किमतीत करून देण्याचे आश्वासन दिले जाते. काही पोस्टमध्ये कमी दरात तसेच अल्पावधीत काम करून देण्याचे सांगितले जाते. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील प्रक्रिया, कागदपत्रे आणि नियमांची माहिती नसलेले नागरिक अशा पोस्टला भुलण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारे संपर्क साधल्यानंतर संबंधितांकडून नागरिकांकडून कागदपत्रे तसेच पैसे घेतले जात असल्याच्याची ही बोलले समोर येत आहेत. मात्र पैसे दिल्यानंतर काम पूर्ण न होणे, फोन न उचलणे किंवा वेगवेगळी कारणे सांगून वेळकाढूपणा करणे, असे प्रकार काही नागरिकांच्या बाबतीत घडल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावरील पोस्टमुळे संबंधित व्यक्ती अधिकृत आरटीओ प्रतिनिधी किंवा एजंट आहे की नाही, याची खात्री न करताच नागरिक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे आरटीओच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक तर केली जात नाही ना?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आरटीओ ऑफिस मधील निगडीत कामे ही ऑनलाईन झालेली आहे ऑफलाइन कुठलेच काम होत नाही ऑनलाईन ही सेवा सर्वांसाठी सोपी व साधी पद्धत आहे. एवढे होऊनही कोणी जर नागरिकाला फसवत असेल तर नागरिकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करावी. तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनाचे कागदपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर वैयक्तिक कागदपत्रांचे फोटो अनोळखी व्यक्तींना व्हॉट्सअॅपवर पाठवू नयेत. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनीष दौड यांनी केले.

नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन याबाबत जालना येथील आरटीओ ऑफिस मधील अधिकारी मनीष दौड यांच्याशी मोबाईल द्वारे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही पोस्टला बळी पडू नये. असे कुठल्याही प्रकारे काम होत नाही. ज्या व्यक्तीला लायसन्स, गाडी ट्रान्सपोर्ट करणे, ट्रान्सपोर्ट लायसन आधी कुठलीही कामे असली रितसर ऑनलाईन फॉर्म भरून तारीख घेऊन परीक्षा पास होणे गरजेचे आहे. तरच त्या माणसाला ट्रान्सपोर्ट लायसन दिले जाते. यामुळे सोशल मीडियावरील पोस्टला बळी पडू नये.
- मनीष दौड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT