... तर सरकारला श्वास घेणेही अवघड होईल; आ. रोहित पवार यांनी सरकारला दिला १३ तारखेचा अल्टीमेटम  File Photo
लातूर

Rohit Pawar ... तर सरकारला श्वास घेणेही अवघड होईल; आ. रोहित पवार यांनी सरकारला दिला १३ तारखेचा अल्टीमेटम

शेतकऱ्यांना १३ तारखेपर्यंत भरीव मदत करा अन्यथा श्वास घेणेही मुश्कील करून टाकू असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला.

पुढारी वृत्तसेवा

MLA Rohit Pawar criticizes the government

निलंगा, पुढारी वृत्तसेवाः मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तुम्ही विरोधी पक्षनेता असताना ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून बोललात पत्र दिले मग आता काय बदल बोलत आहात असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना केला. सत्तेत आल्यानंतर एक भाषा विरोधी पक्ष नेता असताना वेगळी भाषा किती खोटं बोलताय हे जनतेला सांगून टाका शेतकऱ्यांना १३ तारखेपर्यंत भरीव मदत करा अन्यथा श्वास घेणेही मुश्कील करून टाकू असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला.

निलंगा तालुक्यातील लिंबाळा येथे आमदार रोहित पवार यांनी नुकताच अतिवृष्टी भागाचा पाहणी दौरा केला. याप्रसंगी ते बोलत होते. अतिवृष्टी व महापुराने मोठ्या प्रमाणात शेती पिकाची नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये द्या कर्जमाफी करण्याची हीच वेळ आहे कर्जमाफी करा... ओला दुष्काळ जाहीर करा.. मजुरांना आर्थिक मदत करा, काल व आज मी ४० गावांमध्ये गेलो आहे वडिलांकडे पैसे नाहीत शाळेची फीस कशी भरायची असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. शेतकऱ्यांकडे बियाणाला पैसा नाही यासाठी वेगळा अनुदान देऊन कर्जमाफी करावीच लागेल, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

शिवाय सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना अनेक वेळा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून मागणी केली, पत्र दिले परंतु आता सध्या ते मुख्यमंत्री आहेत त्यावेळी एक बोलले आणि आता एक बोलत आहेत. म्हणून त्यावेळी मी खोटं बोललो आता खोटं बोलतोय एक वेळ जनतेला सांगून टाका.. शेतकऱ्यांची चेष्टा करू नका असा टोला त्यांनी यावेळी लगावला. १३ ऑक्टोबरपर्यंत मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या श्वास घेणे मुश्कील करून टाकू असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव पाटील, शिरूर अनतपाळकर, तालुकाध्यक्ष सुधीर मसलगे, अंगद जाधव, संदीप मोरे, महेश चव्हाण अफरोज शेख, निजाम शेख, सचिन राजनाळे आदी उपस्थित होते.

दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांच्यासमोर अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकाबाबत कैफियत मांडल्या आता आमचं शेत रब्बी पेरायलाही येत नाही.. खरीप हंगाम गेला रब्बी हंगाम गेला आम्ही जगावं कसं... सगळे मातीत वाहून गेलय.. खरीप हंगामातील पिकाचा चिखल झाला आहे, अशी निराशाजनक प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांच्यासमोर मांडल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT