शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक उन्नती शक्य pudhari photo
लातूर

MLA Ramesh Karad : शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक उन्नती शक्य

आ. रमेश कराड यांचे प्रतिपादन; रेणापूर येथे पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

रेणापुर : नव्याने उभारण्यात आलेल्या रेणापूर येथील अद्ययावत सर्व सोयीनेयुक्त पशुवैद्यकीय चिकित्सालय इमारतीतून शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या अडीअडचणीची सोडवणूक होईल असे सांगून शेतीला जोडधंदा केल्याशिवाय शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता येणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बदलावी लागेल असे प्रतिपादन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी केले.

पशुसंवर्धन विभागामार्फत रेणापूर येथे तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाची भव्य दोन मजली इमारत उभारण्यात आली असून या इमारतीचा लोकार्पण सोहळा आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाला.

याप्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, सहा. आयुक्त डॉ. राघवेंद्र पडगलवार, पंसचे गटविकास अधिकारी सुमित जाधव, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक अनिता अलगुले, सार्वजनिक बांधकाम रेणापूर उपविभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण देवकर, अभियंता प्रवीण पवार, भाजपाचे अभिषेक आकनगिरे, हेंद्र गोडभरले, पद्माकर चिंचोलकर, दशरथ सरवदे, सतीश आंबेकर, शरद दरेकर, अनिल भिसे, बाबासाहेब घुले, दत्ता सरवदे, मारूफ आतार, श्रीकृष्ण मोटेगावकर, विजय चव्हाण, महेश गाडे, अच्युत कातळे यांच्यासह संबंधित अधिकारी, भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पशुपालक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, शेतकऱ्यांचे पशुधन वाढले पाहिजे त्यासाठी शासन प्रयत्न करीत असून सर्व सोयींनी युक्त असे पशु चिकित्सालयाच्या इमारतीची रेणापुरात उभारणी झाली असून या इमारतीतून पशुधनाच्या अडीअडचणी तातडीने दूर व्हाव्यात. पशुसंवर्धन आणि चिकित्सालय अनुषंगाने ज्या ज्या योजना राबवायच्या आहेत अशा योजनांचे प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांनी तयार करावेत या सर्व प्रस्तावांना पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून मंजूर करून घेण्याची आणि त्यासाठी लागणारा निधी आणण्याची जबाबदारी माझी असेल असेही त्यांनी बोलून दाखविले.

शासनाच्या विविध योजनेचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभमिळवून द्यावा असे त्यांनी सांगितले. प्रारंभी पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी प्रास्ताविकातून रेणापूर तालुका पशुचिकित्सालयाची माहिती देऊन तालुक्यातील पशुधनाचा आढावा सांगितला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश निदुरे यांनी केले. डॉ. श्रीधर शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रारंभी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत डॉ. राजकुमार पडिले, डॉ. पडघलवार, डॉ. ओमप्रकाश पोफळे, डॉ. प्रवीण नानजकर, किशन निंबाळकर, रवींद्र मिसाळ, विजय गिरी, केंद्रे, भागवत नामवाड, डॉ. प्रशांत शिंदे, शरद कोहाळे यांच्यासह अनेकांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT