आ. अमित देशमुख थेट बांधावर, अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी, शेतकऱ्यांना दिलासा... File Photo
लातूर

Latur News : आ. अमित देशमुख थेट बांधावर, अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी, शेतकऱ्यांना दिलासा...

देशमुख यांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पुढारी वृत्तसेवा

MLA Amit Deshmukh inspected the areas affected by heavy rains. Relief to farmers...

लातूर, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे माजी माजी मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित देशमुख यांनी लातूर, चाकूर, उदगीर आणि देवणी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कासारखेडा (ता. लातूर), नळेगाव (ता. चाकूर), तोंडार (ता. उदगीर) आणि पंढरपूर (ता. देवणी) या गावांमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना भेट दिली. शेतकऱ्यांनी यावेळी शासनाकडून मिळणारी अतिवृष्टी मदत तुटपुंजी असल्याची खंतव्यक्त केली. मदत वाढविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार देशमुख यांनी यावेळी दिले. या दौऱ्यात स्थानिक तहसीलदार, पंचायत समिती अधिकारी, कृषी विभाग अधिकारी यांच्यासह लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान आ. देशमुख यांनी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत असताना पंचनामे जलद गतीने पूर्ण करून शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT