लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड येथील औषधी दुकानदाराने ९ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला असून या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध केला जात आहे. दत्ता चिमन्नशेट्टे (वय ५२) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुध्द शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
२ नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मानदुखी बंद होण्यासाठीची गोळी आणण्यासाठी दत्ता चिमनशेट्टेच्या मेडिकल दुकानात गेली होती. चिमशेट्टे याने तिला झाडून काढावयाचे आहे, असे म्हणून तिला वरच्या खोलीत नेले व तेथे लैंगिक अत्याचार करून पंधरा रुपये दिले. त्या चिमुरडीने पंधरा रुपये वडिलांना दिले. त्यावर वडिलांनी मी तुला पाच रुपये दिले होते बाकीचे पैसे कुठून आणले असा सवाल केला. यावर दत्ता मामाने ते मला दिले आहेत असे सांगून तिने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला.
त्यानंतर वडिलांनी जाब विचारला असता आरोपीने मी कुठे काय केले आहे, असे उत्तर दिले. चिमुरडीने दत्ता चिमनशेट्टे याने केलेल्या अत्याचाराची खोली दाखवली व वडिलाने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. आरोपीस स्टेशन गाठून तक्रार दिली. आरोपीस अटक करण्यात आल्याचे व तपास पोलिस अधिकारी एन.व्ही. हाश्मी करीत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक यु.जी. रायबोळे यांनी सांगितले.