Minor girl assault case Pudhari File Photo
लातूर

Minor girl assault case : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी

कारवाई एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

लातूर : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत ३ वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही कारवाई एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आली.

आरोपी संजय गोविंदराव कोळी (वय ४६, रा. विक्रम नगर, लातूर) याने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन व लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली होती. तपास पोलिस उपनिरीक्षक गिते यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. तपासादरम्यान पीडितेचे जबाब, वैद्यकीय अहवाल, पंचनामे व अन्य महत्त्वाचे पुरावे संकलित करून दोष ारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.

या खटल्याची सुनावणी सत्र न्या. एस. व्ही जाधव यांच्या न्यायालयात लातूर येथे झाली. सरकारी वकील एम. एस. महिंद्रकर यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला. तसेच महिला पोलिस अंमलदार बी. टी. हिंगडे यांनी खटल्यात समन्वयाची महत्त्वाची भूमिका बजावली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर पुरावे विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहिता कलम ३५४(अ) तसेच पोस्को कायदा कलम ८ अंतर्गत दोषी ठरविले. न्यायालयाने आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व रुपये ४,००० दंड अशी शिक्षा सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT