Latur Crime : लातूरच्या विवाहितेने पुण्यात गळफास घेऊन जीवन संपवले, पती, सासूविरुद्ध गुन्हा दाखल File photo
लातूर

Latur Crime : लातूरच्या विवाहितेने पुण्यात गळफास घेऊन जीवन संपवले, पती, सासूविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासू विरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Married woman from Latur ends life by hanging herself in Pune, case registered against husband, mother-in-law

लातूर : पुढारी वृत्तसेवा

लातूर, पुढारी वृतसेवा : औसा तालुक्यातील नागरसोगा येथील रहिवाशी असलेल्या व पुण्यात स्थायिक झालेल्या एका विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून घरातच पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पुणे येथे घडली. अनुराधा आकाश बेडगे (वय ३१) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासू विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर येथील काशीलिंगेश्वर नगरमधील रहिवासी व सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी विष्णू किशनराव शिंदे यांची मुलगी अनुराधा हिचा विवाह नागरसोगा येथील आकाश नामदेव बेडगे याच्याशी १० जून २०१४ रोजी रीतीरिवाजाप्रमाणे झाला होता. विवाहानंतर त्यांना मुलगा युवराज व मुलगी आरोही अशी दोन अपत्य झाली. बेडगे कुटुंबीय व्यवसायानिमित्त पसायदान सोसायटी यमुनानगर निगडी, पुणे येथे झाले. आकाश बेडगे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो.

मात्र विवाहाच्या दोन वर्षांनंतर पती आकाश व सासू गीताबाई नामदेव बेडगे हे दोघे अनुराधाला जमीन विकत घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देत होते. मुलीचा संसार चांगला चालावा म्हणून वडील विष्णु शिंदे यांनी अनेक वेळा त्यांची पत्नी व मुलाच्या बँक खात्यातून जावई आकाशच्या खात्यात रक्कम पाठविली होती.

अनेक वेळा मागणी पूर्ण करूनही अनुराधाला पती व सासूकडून शारीरिक व मानसिक त्रास सुरू होता. दरम्यान, दि. १ सप्टेंबर रोजी जावई आकाशने फोन करून सांगितले की, अनुराधाने गळफास घेतला आहे. त्यानंतर शिंदे कुटुंबीय सायंकाळी पुण्याकडे निघाले.

पिंपरी येथील वायसीएम हॉस्पिटलमध्ये ते पोहोचले असता मुलगी अनुराधा मरण पावल्याचे समजले. डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर मुलीचे प्रेत ताब्यात दिले. त्यानंतर विष्णू शिंदे यांनी निगडी पोलीस ठाणे जावई आकाश व सासू गिताबाई बेडगे या दोघांविरुद्ध मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दिली. त्यावरून निगडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT