देवणी : ४२ जणांची माघार, २८ उमेदवार मैदानात देवणी: जिल्हा परिषदेच्या ३ गटासाठी ११ उमेदवार तर ६ पंचायत समितीच्या गणासाठी १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उत्तरले आहेत. जिल्हा परिषद गटासाठी २७ नामनिर्देशनपत्र पैकी १६ नामनिर्देशन पत्र अखेरच्या दिवशी माघारी घेण्यात आले वर ६ पंचायत सुमिती गणासाठी एकूण ४३ नामनिर्देशक पत्र वैद्य ठरले होते. त्यापैकी २६ नामनिर्देशन पत्र आज माघारी घेतल्याने १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या बोरोळ जिल्हा परिषद गटासाठी भाजप आणि काँग्रेस सरळ लढत होत आहे तर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या आणि जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या दावेदार असलेल्या वलांडी जिल्हा परिषद गटासाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वसाध ारण जवळगा जिल्हा परिषद गटासाठी भाजप व काँग्रेसने लिंगायत उमेदवार दिल्याने मताचे ध्रुवीकरण करण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने जातीय समीकरण जुळवत मराठा समाजाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून कडवे आव्हान निर्माण केले आहे.
तर शिवसेना शिंदे गटाने धनगर समाजाच्या उमेदवाराला उतरवल्याने निवडणुकीत, राजकीय रंगत भरली आहे. तर तळेगाव, विळेगाव, व दवणहिप्परगा पंचायत समिती गणात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी एकास एक लढत होणार आहे. तर बोरोळ व जवळगा पंचायत समिती गणात चौरंगी लढत होणार आहे तर उमेदवारी परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी वलांडी पंचायत समिती गणात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उदगीर जि.प. ३९, पं.स. ६८ जणांची माघार उदगीर तालुक्यात ७ जिल्हा परिषद गटातील ७४ उमेदवारांपैकी ३९ उमेदवारी अर्ज मागे घेत्याने आता ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. तसेच १४ पंचायत समिती गणातील १२६ उमेदवारांपैकी ६८ उमेदवारांनी माघार घेतल्याने ५८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांनी दिली.
गटनिहाय उमेदवार संख्या, जिल्हा परिषद गट वाढवणा (बु) ४, सोमनाथपूर ८, नळगीर ४. निडेबन ८. लोहारा एकुण ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. व तसेच पंचायत समिती गण निहाय उमेदवार संख्या, इंडरगुळी-३, वाढवणा (बु) ४, गुडसूर ७, हेर४, तोगरी ५, असे ४, सोमनाथपूर ४, नळगीर३, नागलगाव ४, शिरोळ जाणापूर ४, निडेबन ३, लोहारा ७, कुमठा (ख) ४, हेर ६, देवर्जन४, दावनगाव ३. तोगरी ५ असे ५८ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.
जळकोट निवडणुकीतून २० उमेदवारांची माघार जळकोट जिल्हा परिषद गटातून १७ पैकी ४ जणांनी माघार घेतली तर पंचायत समितीच्या ४१ पैकी १६ जणांनी माघार घेतली. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी आता १३ आणि पंचायत समितीसाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे व तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिली.
औसा: जि.प.साठी २७ पं. स. साठी ६३ उमेदवार औसा तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गट व अठरा पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद गटासाठी ३१ जणांनी व पंचायत समितीच्या गणातील ४५ अशा एकूण ७६ जणांनी माघार घेतली आहे त्यामुळे आता जिल्ह्य परिषदेचे २७ व पंचायत समिती गणाचे ६३ असे एकूण ९० उमेदवार रिंगणात आहेत.
शिरूर अनंतपाळ जि. प. पं. स. निवडणुकीत २९ उमेदवार रिंगणात शिरूर अनंतपाळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन गटांतून १२ उमेदवार तर पंचायत समितीच्या विविध गणांतून १७ उमेदवार रिंगणात उतरले असून गट व गण मिळून एकूण २९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. जिल्हा परिषद येरोळ गटातून ६ व साकोळ गटातून ६ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. तसेच हिप्पळगाव गणातून ७, हिसामाबाद गणातून ४, साकोळ गणातून ३ व येरोळ गणातून ३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.