Mahayuti flag hoisted on Latur's mini ministry
लातूर, पुढारी वृतसेवा उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या लातूर जिल्हापरिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार असून युतीधर्म पाळत सोपस्कार पूर्ण करण्याचा संकल्प महायुतीच्या नेत्यांनी केला आहे. पक्षीय बलाबल पहाता अजितदादांच्या राष्ट्रवादीने दिलेल्या साथीमुळेच महायुतीचे सत्ता स्वप्न वास्ताव येणार आहे. दादांच्या राष्ट्रवादीनेचे भाजपाची लाज राखल्याची चर्चा जिल्हाभर झडत आहे, हाती आलेले पक्षनिहाय बलाबलही हे वास्तव भक्कपणे स्पष्ट करीत आहे.
अटीतटीच्या अन प्रतिष्ठेच्या या रणसंग्रामात जिल्हापरिषदेसाठी भाजपा १८, राष्ट्रवादी अजित पवार १२, काँग्रेस २३, अपक्ष २, राष्ट्रवादी शरद पवार, उबाटा, मनसे व शिवसेना प्रत्येकी एक असा कौल मतदाराजाने दिला आहे. ५९ गटासाठी झालेल्या या ही निवडणुकीच्या आखाड्यात अनेक पक्ष असले तरी अनेक ठिकाणी काँग्रेस व महायुती अशी दुरंगी तर युती नसलेल्या ठिकाणी तीरंगी तर कुट् चौरंगीही लढती झाल्या.
त्यातील बऱ्याच लक्षवेधीही ठरल्या. यात बाजी मारली ती महायुतीच्या उमेदवारांनी. महायुतीचे एकत्रीत बलाबल वनिलंगा तालुक्यातील तांबाळा गटाचा भाजपा पुकरस्कृत विजयी उमेदवार पहाताहा आकडा ३१ वर पोहचत असल्याने बहुमताची बेरीज सहज जमून येत आहे. विशेषम्हणजे युतीधर्म पाळण्याची मानसिकता भक्कम असल्याने महायुतीच्या वारुस सत्तेत जाण्यासाठी कोणालाही रोखता येणार नाही, यापूर्वी लातूर जिल्हा परिषद भाजपाच्या ताब्यात होती.
त्यावेळी तब्बल ३६ सदस्य होते. काँग्रेस १५, राष्ट्रवादी ५, शिवसेना व अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल होते, यावेळी मात्र काँग्रेसने तुल्यबळ लढत देत २३ जागा काबीज केल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने केलेले सुक्ष्म नियोजन, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा तगडा जनसंपर्क, आमदार संजय बनसोडे यांचीही साथ अन अजितदादांच्या निर्वाणामुळे या पक्षास मिळालेली सहानभुतीची लाट ही राष्ट्रवादीच्या लक्षवेधी विजयश्रीसाठी जमेची ठरली आहे.
गत निवडणुकीतलाआकडा पहाता काँग्रेसने या निवडणुकीत ८ जागांची आघाडी घेतली असून माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आ. अमित देशमुख, माजी आ. धीरज देशमुख यांच्या व्यापक नियोजन व प्रभावी प्रचार यंत्रनेचे ते फलीत ठरले आहे.
मनसेच्या डॉ. सुनिल नागरगोजे यांनीही लक्षवेधी विजय मिळवला आहे. भाजपाने तगडी फाईट दिली आहे. आ. संभाजी पाटील, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेशअप्पा कराड यांनी व्यापक नियोजन केले होते. त्यांनी १८ जागांवर विजय संपादन केला आहे त्यांच्या मित्रपक्षांचा विचार करता बहुमताचा आकडा साध्य झाला आहे त्यामुळे महायुतीच लातुरच्या मीनी मंत्रालयाचे सारथ्य करणार आहे.
गणातही भाजप अन् मित्रपक्षांची सरसी
जिल्ह्यात ११८ गणासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप व त्यांचे मित्रपक्षच सरस ठरले आहेत. लातूर व जळकोट या दोन पंचायत समितीवरील काँग्रेसचे वर्चस्व व रेणापूर पंचायत समितीच्या त्रिशंकू निकालाचा अपवाद वगळता उर्वरित सातपंचायत समितीवर भाजप व त्यांच्या मित्रपक्षांची फतेह झाली आहे. लातूर व जळकोट पंचायत समिती कॉंग्रेस, चाकूर अजित पवार राष्ट्रवादी, औसा, निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ भाजप तर उदगीर व अहमदपूर या पंचायत समित्यांवर महायुतीची सरशी झाली आहे.
रेणापूर पंचायत समितीसाठी मनसे निर्णायक
रेणापूर पंचायत समितीसाठी भाजप ३, काँग्रेस ३ व मनसे २ असे पक्षीय बलाबल आहे. बहुमतासाठी काँग्रेसला व भाजपलाही मनसेवर अबलंबून रहावे लागणार असल्याने मनसे फॅक्टरच येथे किंगमेकर ठरणार आहे. विशेष म्हणजे या पंचायत समितीचे सभापतीपद खुल्या प्रवर्गातील महीलेसाठी सुटले आहे. कॉंग्रेसकडे या प्रवर्गातील महीला नाही भाजप व मनसेकडे त्या आहेत. त्यामुळे काँग्रेस मनसेला सभापतीपदाची ऑफर देवू शकते त्याचवेळी भाजपही असा प्रस्ताव मनसेकडेठेवू शकते मनसे कुणाचा प्रस्ताव स्विकारेल यावरुन ही पंचायत समिती कोणाच्या ताब्यात राहील हे कळेल.
युतीधर्मास जागणार, विकास रथ गतिमान करणार: मंत्री बाबासाहेब पाटील
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निकाल पहाता अजितदादांच्या राष्ट्रवादीची कामगीरी उल्लेखनीय ठरली आहे. दरम्यान याबाबत मतदारांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत महायुतीचा धर्म पाळणार असल्याचे या विजयाचे शिल्पकार राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. आम्ही जनतेला दिलेल्या शब्दांशी एकनिष्ठ राहून विकासाचा रथ अधिक भरधाव करु अशी भावना बाबासाहेब पाटील यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केली.