Latur Vikas Parv regional sports complex Shivajirao Patil Kavekar
लातूर पुढारी वृत्तसेवा: कव्हा येथे होऊ घातलेल्या विभागीय क्रीडा संकुलाच्या माध्यमातून विकासाचे एक नवे पर्व मराठवाड्यात अवतरेल व लातूर जिल्हा यात अग्रेसर असेल, असा विश्वास भाजपा नेते माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
इमारत विभागीय क्रीडा संकुल बांधकाम भूमिपूजन तसेच एनआरएचएम अंतर्गत कव्हा येथे उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन तसेच त्या गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ०८ ऑगस्ट शुक्रवारी सकाळी १०.०० वा. कव्हा येथील स्वामी दयानंद विद्यालय येथे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री आ. अमित देशमुख, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, खा. डॉ. शिवाजीराव काळगे, खा. ओमराजे निंबाळकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेशअप्पा कराड, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर, भाजपाचे मराठवाडा समन्वयक संजय कौडगे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, अर्चना पाटील चाकूरकर यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे कव्हेकर यांनी सांगितले, पत्रकार परिषदेला भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, गुरूनाथ मगे, जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, तालुका कार्याध्यक्ष राजाभाऊ मुळे, नगरसेविका रागिणी यादव, बालाजी शेळके आदी उपस्थित होते.