उदगीर : उदगीर - लातूर रोडवरील उदगीर येथील शासकीय विश्रामगृहासमोर भरधाव वेगात असलेली इनोव्हा कार डिव्हायडरला आदळून झालेल्या भिषण अपघातात इनोव्हा कार मधील एकाचा मृत्यू झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (१२ जून) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, इनोव्हा कारमधून चार जण वलांडीकडे जात असताना उदगीर येथील नळेगाव रोडवरील शासकीय विश्रामगृहा समोर रोडवरील डिव्हायडरला इनोव्हा कार क्र. एम एच २४ ए एस २५५५ ही भरधाव वेगात डिव्हायडरला धडकून हवेत उडाली व तील कोलाट्या खावून फरफटत ८० फुट समोर जावून स्विफ्ट कार एम एच १२, जे १५४६ या कारला धडकली. झालेल्या भिषण अपघातात इनोव्हा कारमधील सचिन काशिनाथ मांडगुळे वय ३२ वर्षे, रा. वर्षे, (रा.लखनगा ता.भालकी हा.मु.वला) यांचा मृत्यू झाला. तर अश्विन बालाजी सोनकवडे वय २४ वर्षे, अशिलेश बालाजी सोनकवडे वय २२ वर्षे, आणि संकेत प्रभाकर सोनकवडे वय १९ वर्षे तिघेही रा. वलांडी ता. देवणी हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तिघा जखमींना उदगीर येथील सामान्य रुग्णालयात प्राथमिकत उपचार करुन खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.