

Latur accident
औसा : औसा-तुळजापूर महामार्गांवर आशिव ते उजनी दरम्यान दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. त्यात एका व्यक्तीचा जागेवर मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लातूरला हलवले आहे. हा अपघात गुरूवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडला.
औसा-तुळजापूर महामार्गांवर आशिव - उजनी दरम्यान दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. एका ट्रॅव्हल्सच्या समोरचा भाग चक्काचूर झाला. तर दुसरी ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली गेली. या दोन्ही ट्रॅव्हल्स मुंबई ते उदगीर प्रवास करत होत्या. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना लातूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी भादा व हायवे पोलिसांनी दाखल होत पंचनामा केला.