Arrested Pudhari
लातूर

Latur Crime News: २८ वर्षापासून फरार असलेल्या शाखा डाकपालला लातूर पोलिसांकडून अटक

सरकारी रकमेच्या अपहार प्रकरणात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अटक केली.

पुढारी वृत्तसेवा

Latur police arrest Branch Postmaster absconding for 28 years

लातूर, पुढारी वृत्तसेवा : सरकारी रकमेच्या अपहार प्रकरणात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अटक केली. अपहारप्रकरणी तब्बल २८ वर्षांपासून फरार असलेल्या शाखा डाकपालाला लातूरच्या स्थानिक संजय केशवराव देशपांडे (वय ६२, रा. हलगरा, ता. निलंगा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गांधी चौक पोलीस ठाण्यात १९९८ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी हलगरा शाखा डाकघरात शाखा डाकपाल असताना बचत खातेदारांच्या ठेवींचा अपहार केल्याचा आरोप आहे. चौकशीत बनावट स्वाक्षऱ्या व खोट्या कागदपत्रांच्या आधारे दोन खात्यांमधील एकूण १७ हजार ३६१ रुपये काढून अपहार केल्याचे निष्पन्न झाले होते.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तो न्यायालयीन प्रक्रियेला हजर न राहता फरार झाला होता. न्यायालयाने अटक वॉरंट आणि जाहीरनामाही काढला होता. फरार आरोपींच्या शोध मोहिमेदरम्यान पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथकाने औसा रोड परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

वैद्यकीय तपासणीनंतर त्याला गांधी चौक पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले व पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT