Latur Massive Fire : निलंग्यात तीन मजली इमारतीला भीषण आग File photo
लातूर

Latur Massive Fire : निलंग्यात तीन मजली इमारतीला भीषण आग

शहरातील लातूर-बिदर रोडवरील अटल वाकच्या शेजारी असलेल्या तीन मजली इमारतीला शनिवारी रात्री दीडच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.

पुढारी वृत्तसेवा

Latur News: Massive fire at a three-storey building in Nilanga

निलंगा, पुढारी वृत्तसेवा : शहरातील लातूर-बिदर रोडवरील अटल वाकच्या शेजारी असलेल्या तीन मजली इमारतीला शनिवारी रात्री दीडच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने तळमजल्यावरील कॉलिटी इंटरप्राईजेस हे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले.

दुकानातील प्लास्टिक व अभियांत्रिकी साहित्य जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची झळ इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांवर असलेल्या बंधन पतसंस्थेच्या कार्यालयालाही बसली असून, महत्त्वाची कागदपत्रे जलाल्याचा प्राथमिक अंदाज आहे

आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र अग्निशामक वाहनातील पाणी संपल्याने ते पुन्हा पाणी भरण्यासाठी जावे लागले. त्यामुळे आग विझविण्याच्या प्रयत्नांना काहीसा विलंब झाला आणि तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले.

पोलीस यंत्रणा, नगरपालिका प्रशासन, अग्निशामक दल आणि स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न करून बराच वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT