Latur Rain News : लातूर जिल्ह्यात पावसाची हजेरी; मोठ्या पावसाची प्रतीक्षा

बळीराजाचा चेहरा सुखावला; जलसाठ्यासाठी दमदार सरींची गरज
Latur Rain News
Latur Rain News : लातूर जिल्ह्यात पावसाची हजेरी; मोठ्या पावसाची प्रतीक्षाfile photo
Published on
Updated on

Rain arrives in Latur district; wait continues for heavy rainfall

लातूर, पुढारी वृत्तसेवाः ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते आणि जो आता अत्यावश्यक बनला होता, त्या पावसाने शुक्रवारी जिल्ह्यात हजेरी लावली. कुठे मध्यम तर कुठे हलक्या स्वरूपात बरसलेल्या पावसामुळे काळजीने काळवंडलेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर काही अंशी समाधान झळकले. गौरी आगमनाच्या दिवशीच पावसाचे आगमन झाल्याने 'गौरीची कृपा झाली', अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. मात्र, जलस्रोतांमध्ये पुरेसा साठा होण्यासाठी आणखी दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची गरज आहे.

Latur Rain News
Crop Damage : आ. संतोष दानवेंनी केली पीक नुकसानीची पाहणी

जिल्ह्यात गुरुवार रात्रीपासून शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी १७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रेणापूर तालुक्यात सर्वाधिक ३९.३ मिलिमीटर पाऊस झाला. त्यानंतर लातूर तालुक्यात ३७.७, औसा २२.८, निलंगा ११.५, चाकूर १०.५, जळकोट ९.२, उदगीर ८.७, अहमदपूर ७.१, शिरूर अनंतपाळ ५.७आणि देवणी तालुक्यात २.८ मिलिमीटर पाऊस झाला.

जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३३५.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, पावसातील खंडामुळे शेतकरी आणि नागरिकांसमोरील पाणीटंचाईचे संकट कायम आहे. पिकांना सध्या पावसाची नितांत गरज असून, आगामी काळात पावसाने सातत्य राखले आ जोरदार सरी कोसळल्या तरच पिकांची वाढ होऊ उत्पादनाची आशा निर्माण होणार आहे.

Latur Rain News
Eleven Marutis : अकरा मारुतींच्या सान्निध्यात भूगोलाची अद्भुत दुनिया !

दुसरीक रानावरील चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून गुरांच पिण्याच्या पाण्याचीही मोठी चणचण निर्माण झा आहे. अनेक गावांनी टँकरने पाणीपुरवठ्याची माग केली आहे. जलस्रोत आटत चालल्याने 'आता कसे होणार?' या चिंतेने शेतकरी हवालदिल झा आहेत. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांज धरणातील पाणीसाठाही ११ टक्क्यांपेक्षा क राहिला आहे. बंधारे कोरडे असून विहिरी आ बोअरवेलची पाणीपातळीही चिंताजनक आ त्यामुळे शुक्रवारी झालेल्या पावसाने दिला मिळाला असला तरी मोठ्या आणि सलग पावसा प्रतीक्षा कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news