Latur News: Administration keeps an eye on candidates' expenses
उदगीर, पुढारी वृत्तसेवा : उदगीर नगरपालिकांमध्ये १नगराध्यक्ष, तर ४० नगरसेवक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. त्यासाठी निवडणुकीचा खर्च जाहीर झाला असून यामध्ये पाण्याची बाटली २० रुपये, नाश्ता १५ रुपये, शाकाहारी भोजन १२० रुपये यांचा समावेश आहे. उमेदवारांना आता याच दरांमध्ये खर्च करावा लागणार आहे.
उदगीर नगरपालिकांसाठी निवडणूक आहे. त्यानुसार उमेदवारांकडून प्रभागातील प्रचारासाठी जोर लावला जात आहे. कार्यकर्त्यांसमवेत उमेदवारांचा दिवसभर मतदारराजांच्या गाठीभेटीत जात आहे. २० रु. नाश्ता नोंद करावा लागेल, तर अल्पभोजन, राइसप्लेट १०० रुपये, शाकाहारी १६० रुपये, मांसाहारी २५० रुपये, चहा, कॉफी १० रुपये, पाणी बॉटल १३ रुपये, तर शीतपेय १५ रुपये असा दर आहे.
याशिवाय बँड पथक, ढोल-ताशा गाडीसह पाच माणसे असल्यास १००१ रुपये प्रतितास याप्रमाणे दर ठरवण्यात आला आहे. अशी आहे खर्चमर्यादा नगरपालिका नगराध्यक्ष सदस्य, वर्ग अ वर्ग १५ लाख ५ लाख व वर्ग ११.२५ लाख ३.५० लाख क वर्ग ७.५० लाख २.५० लाख व्हिडीओ कॅमेराचाही राहणार वॉच उमेदवारांद्वारा प्रचारात वाढता अनावश्यक खर्च, मोठमोठे फलक, आकर्षक प्रचार मोहीम आणि पैशांच्या देवाण-घेवाणीवर अंकुश आणण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत.
यावर व्हिडीओ कॅमेराचाही वॉच राहणार आहे. खर्च मर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दिवसभर कार्यकर्ते सोबत असल्याने त्यांचा खर्चही उमेदवारांना करावा लागत आहे. आता निवडणूक खर्चाच्या नोंदी कक्षात सादर कराव्या लागणार आहेत. हा खर्च निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या दरपत्रकाप्रमाणे सादर करावा लागत असल्याने नेत्यांना प्रचारासाठी नियमात राहूनच खर्चाचे नियोजन करावे लागणार आहे.
अर्ज भरल्यापासून खर्चाचे मीटर सुरू
उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून त्यांच्या खर्चाचा मीटर सुरू झालेला आहे. शिवाय उमेदवारांना होणाऱ्या खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते काढावे लागते. तर नियमित खर्च सादर करावा लागणार आहे. यामध्ये मयदिपेक्षा जास्त खर्च झाल्यास कारवाई होणार आहे.