मृत देवांश स्वामी आणि आरोपी अनिता स्वामी  pudhari photo
लातूर

Latur Crime : पतीसोबत अनैतिक संबंध असलेल्या महिलेला अडकवण्यासाठी पुतण्याचा गळा दाबून खून

चाकूर हादरले : आरोपी चुलती अटकेत, चार दिवसांची पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

चाकूर : पतीसोबत अनैतिक संबंध असलेल्या महिलेला अडकवण्यासाठी चुलतीने आपल्या 7 वर्षीय पुतण्याचा गळा दाबून खून केला. ही धक्कादायक घटना चाकूर शहरात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी निर्दयी चुलती अनिता स्वामी हिला अटक केली. तिला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार रविवार 19 एप्रिल रोजी मंगेश स्वामी यांचा मुलगा देवांश मंगेश स्वामी (7 वर्षे) व साईचरण दिनेश स्वामी (10 वर्षे) हे दोघे चुलत भाऊ सकाळी खेळण्यासाठी गेले. बराच वेळ झाला तरी ते दोघे घरी परत न आल्याने नातेवाईकांनी ही माहिती दुपारी पोलीसांना दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून शोध मोहीम राबविली असता उजळंब रोडवरील एका पडक्या घराजवळ ट्रॅक्टरच्या टायरच्या अडोशाला देवांश मंगेश स्वामी या बालकाचा मृतदेह आढळून आला. घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही, तांत्रिक तपास, करून तपास सुरू केला.

फिर्यादी मंगेश स्वामी यांची वहिनी अनिता स्वामी हिच्या संशयास्पद हालचाली व जबाबात विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच अनिताने आपल्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यावरून दोघा पती-पत्नीत नेहमी भांडण होत. त्यामुळे स्वतःच्या आणि दिराच्या मुलाचा अपहरणाचा बनाव करून दिराच्या मुलाचा खून करून त्याचा आरोप पतीसोबत अनैतिक संबंध असलेल्या महिलेवर टाकून तिला अडकवण्यासाठी सदरचा कट रचून देवांशचा खून केला, अशी कबुली दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT