शेतजमीन वाटणीच्या वादातून चुलतीने पुतण्याचा गळा दाबून केला खून

चुलती पोलिसांच्या ताब्यात, चाकूर परिसरातील हादरवणारी घटना
Murder news
Murder news
Published on
Updated on

चाकूर : शेतजमीन वाटणीच्या वादातून चुलतीने ७ वर्षीय पुतण्याचा गळा दाबून खून केल्याची अत्यंत धक्कादायक घटना चाकूर शहरात जुने महादेव मंदिर परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी चुलतीला अटक केली आहे. या घटनेने चाकूर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवारी १९ एप्रिल रोजी अनिता दिनेश स्वामी हिने शेतजमिनीच्या वाटणीच्या वादातून आपला सख्खा पुतण्या देवांश मंगेश स्वामी (वय ७) याचा गळा दाबून खून केला आहे. तसेच खून केल्यानंतर त्याचा मृतदेह लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा कोणावरही संशय येऊ नये यासाठी आरोपी अनिता स्वामीने स्वताचाच मुलगा बेपत्ता असल्याचा खोटा बनाव केला आहे. या घटनेने चाकूर व परिसर हादरला असून शेतजमीन वाटणीच्या वादातून अनिता दिनेश स्वामी हीने टोकाचे पाऊल उचलत पुतण्या देवांश याचा निर्घृण खून केला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून घटनास्थळी भेट दिली व पंचनामा करून तपासाची चक्रे अधिक गतिमान करून आरोपी अनिता स्वामीला अटक केली आहे.

मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिता दिनेश स्वामी विरोधात चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी भंडे हे करीत आहेत. हदयद्रावक या घटनेने चाकूर व संपूर्ण परिसर हादरला असून चाकूर पोलीस स्टेशन व परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

घटनास्थळी श्वानपथक,न्यायवैद्यक प्रयोग शाळेच्या पथकाने भेट देवून तपास केला.तर घटनास्थळी पोलीस अधिक्षक अमोल तांबे ,अप्पर पोलीस अधिक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. शेवटी या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणातील बेपत्ता दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या शोधासाठी चाकूर पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके तयार करून विविध ठिकाणी तपासासासाठी रवाना करण्यात आली होती. रात्री लातूर येथील स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सारोळा रोड परीसरात बेपत्ता असलेला साईचरण दिनेश स्वामी (वय १० वर्षे) हा दुसरा मुलगा सापडल्याने हे प्रकरण वेगळे वळणावर पोहचून पोलिसांना या प्रकरणाचा छडा लागला आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news