लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. दत्ता चिमनशेट्टे असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने रविवारी (दि.२) फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील एका गावात दत्ता चिमनशेट्टे याचे मेडिकल आहे. या मेडीकलमध्ये औषधाची गोळी आणण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलगी गेली होती. त्यावेळी दत्ता चिमनशेट्टे याने तिला मेडिकलमध्ये झाड़ू मारण्यासाठी बोलावून घेतले. त्यांनतर मेडिकलमधील एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला, अशी फिर्याद मुलीच्या आईने दिली आहे. याप्रकरणी आरोपी दत्ता चिमनशेट्टे याच्याविरूद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एन व्ही हाशमी करीत आहेत.