Bribery Case file photo
लातूर

Latur land surveyor arrested for bribery|नकाशाच्या प्रतीसाठी ५०० रुपयांची लाच, अहमदपूर भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक जाळ्यात

Latur land surveyor arrested for bribery|नकाशाच्या प्रतीसाठी ५०० रुपयांची लाच, अहमदपूर भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

लातूर- चतुःसीमा नकाशाची प्रमाणित प्रत देण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अहमदपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले. अक्षय ओमप्रकाश बुगाडे (वय ३२) असे आरोपी लोकसेवकाचे नाव - आहे.

तक्रारदार हे अहमदपूर तालुक्यातील लाजणी येथील शेतकरी आहेत. त्यांच्या शेतजमिनीच्या चतुःसीमा नकाशाची आवश्यकता असल्याने त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. या नकाशाची प्रमाणित प्रत देण्यासाठी भूकरमापक अक्षय बुगाडे याने तक्रारदाराकडे ५०० रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विभागाने १६ नोव्हेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी केली. त्यानंतर अहमदपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचण्यात आला.

यावेळी आरोपी बुगाडे याने तक्रारदाराकडून ५०० रुपये स्वीकारले. त्याचवेळी पथकाने त्याला लाचेच्या रकमेसह पकडले. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. नागरिकांनी शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT