जळकोट येथे आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना शिक्षण विस्तार अधिकारी के. पी. बिरादार  Pudhari
लातूर

Pudhari Talent Search Exam | 'दै. पुढारी'च्या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षेची चळवळ गतिमान होईल : के. पी. बिरादार

पुढारी वृत्तसेवा

Teacher Training Workshop Jalkot Latur

जळकोट : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणे कठीण जाते. गरिबीमुळे शालेय जीवनातच अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांपासून वंचित राहतात. मात्र, पुढारी माध्यम समूह आयोजित पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा सारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षांची चळवळ अधिक गतिमान होईल, असा विश्वास शिक्षण विस्तार अधिकारी के. पी. बिरादार यांनी व्यक्त केला. पुढारीने हाती घेतलेली ही भूमिका विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

12 मार्चरोजी होणाऱ्या पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले पब्लिक स्कूल, जळकोट येथे शुक्रवारी (दि. 6) जळकोट तालुक्यातील शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना बिरादार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सी. एन. बिरादार होते.

यावेळी कोल्हापूर येथील पुढारीचे वितरण व्यवस्थापक अशोक पाटील, केंद्रप्रमुख बालाजी काटे (पाटोदा बु./मंगरुळ केंद्र), मीना पाटील (अतनूर/घोणसी केंद्र), माधवराव हंगरगे (वांजरवाडा केंद्र), पुढारीचे तालुका प्रतिनिधी अजीज मोमीन, तज्ज्ञ मार्गदर्शक ग्रामपंचायत अधिकारी एस. एम. पाटील, प्रतीक्षा रामराव शिंदे, डी. आर. पवार, साधन व्यक्ती अर्जुन जाधव, कांबळे, तसेच शिक्षक नेते विजयकुमार तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

अशोक पाटील यांनी प्रस्ताविकातून दै. पुढारीतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेसाठी सर्व शिक्षकांनी सक्रिय सहकार्य देऊन हा शैक्षणिक गुणवत्ता वाढीचा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी अजीज मोमीन, केंद्रप्रमुख बालाजी काटे आणि विजयकुमार तेलंग यांनीही मनोगत व्यक्त केले. तज्ज्ञ मार्गदर्शक एस. एम. पाटील, प्रतीक्षा शिंदे आणि डी. आर. पवार यांनी परीक्षेच्या स्वरूपाबाबत सविस्तर मार्गदर्शन करत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. या उपक्रमासाठी गट शिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजीज मोमीन यांनी केले. या कार्यशाळेला जळकोट तालुक्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT