Accident News Pudhari
लातूर

Latur Jalkot Accident | जळकोट महामार्गावर उभ्या असलेल्या मालट्रकला कारची धडक : महिला ठार, ३ जण गंभीर जखमी

जळकोट शहरातील महात्मा फुले चौकाजवळ घटना

पुढारी वृत्तसेवा

Latur Jalkot highway car truck collision

जळकोट : नांदेड - जळकोट - उदगीर राष्ट्रीय महामार्गावर जळकोट शहरातील महात्मा फुले चौका लगत नादुरुस्त होऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या एका मालट्रकला पाठीमागून येणारी कार धडकल्याने एक महिला ठार झाली. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. नांदेडहून कर्नाटक राज्यात एका नातेवाईकाच्या अंत्यविधीला जात असताना काळाने घाला घातला. अपघातग्रस्त कार मधील व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत.

जळकोट शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या नादुरुस्त मालट्रकला पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी (दि.3) रात्री घडली. या भीषण अपघातात कारमधील ध्रुपतबाई बस्वराज सूर्यवंशी ही महिला ठार झाली आहे. तर बस्वराज रावण सूर्यवंशी, गणेश बस्वराज सूर्यवंशी व वर्षा श्रीकांत म्हेत्रे (सर्व रा. शिवनगर, नांदेड) हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी उदगीर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून आता लातूर येथे हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालट्रक नादुरुस्त होऊन रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान, वेगात येणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट ट्रकच्या मागील बाजूस आदळली व आत घुसली. धडकेची तीव्रता इतकी होती मोठी की या धडकेचा मोठा आवाज दूरवर ऐकायला मिळाला. या धडकेने कारचा पत्रा कापून निघाला आहे.

कर्नाटकातील डोणगाव येथे अंत्यविधीला निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची जळकोट पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT